Saturday, June 29, 2024

फॅन असावी तर अशी! शहनाजला भेटण्यासाठी चाहतीने केले सात समुद्र पार, पाहा भन्नाट व्हिडिओ

छाेट्या पडद्यवरील वादग्रस्त आणि तितकाच लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 13‘ पासून शहनाज गिल हे देशातील एक प्रसिद्ध नाव बनलेली आहे. या शोनंतर शहनाज इतकी लोकप्रिय झाली की, आता परदेशातही तिची फॅन फॉलोइंग वाढत आहे. सिंगरच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, तिची एक चाहती तिला भेटण्यासाठी अमेरिकेतून दुबईला गेली होती. दुबईतील एका हॉटेलमध्ये चाहतीला तिच्या आवडत्या स्टारची भेट होताच ती भावूक झाली आणि रडू लागली.

शहनाज (Shehnaaz Gill) हिच्या या महिला चाहतीने तिला सांगितले की, “तिने फक्त तिला भेटण्यासाठी कॅलिफोर्निया ते दुबई असा 16 तासांचा प्रवास केला.” हे ऐकून शहनाजने तिच्या चाहत्याला विचारले की, “तू ठीक आहे ना?” यासोबतच शहनाजने चाहतीला मिठी मारली आणि तिच्याशी निवांतपणे बोलली. शहनाज आणि तिच्या फॅनमधील संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्री प्रती तिच्या चाहत्याचे हे प्रेम पाहून युजर्स तिचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओमध्ये, जेव्हा पॅपराझी एका चाहतीला तिच्या प्रवासाबद्दल विचारताे तेव्हा ती म्हणते, ‘शहनाजसाठी काहीही.’ अभिनेत्रीचे व्हिडिओ आणि फाेटाे अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. तिच्या लूकसोबतच ती जबरदस्त स्टाइल आणि गाण्यासाठीही चर्चेत आहे. दुसरीकडे, अभिनेत्री लवकरच तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे.

शहनाज गिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शहनाज सलमान खानसाेबत ‘किसी का भाई किसी की जान’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन फरहाद सामजी आणि साजिद नाडियादवाला यांनी केले आहे. चित्रपटात सलमान खानशिवाय पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती आणि पार्थ सिद्धपुरा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (viral social shehnaaz gill fan travels from usa to dubaitears down after meeting her video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
एक्स बॉयफ्रेंडने सुश्मिताला दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियावर फोटो होतोय तुफान व्हायरल

बिचारा अब्दु! बिग बॉसच्या घरात निमरित कौरच्या बॉयफ्रेंडची एंट्री…

हे देखील वाचा