शहनाझ गिलच्या वडिलांचे मोठे पाऊल; सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर घेतला ‘हा’ निर्णय


अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले. सिद्धार्थच्या निधनाला १४ दिवस झाले आहेत. मात्र, त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाझ गिल अजूनही स्वतःला या दुःखातून सावरू शकली नाही. सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या वेळी समोर आलेले तिचे फोटो लोक आजही विसरू शकत नाहीत. शहनाझ सिद्धार्थवर खूप प्रेम करायची, पण सिद्धार्थच्या मृत्युनंतर शहनाजला आता खूप एकटे वाटू लागले आहे. मुलीची ही अवस्था शहनाझचे वडील संतोख सिंग गिल यांच्याकडून ही पाहिली जात नाही. म्हणून आपल्या मुलीसाठी एक मोठे पाऊल त्यांनी उचलून एक निर्णय घेतला. ज्यामुळे त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य येऊ शकते.

शहनाझ गिलची दुःखद स्थिती पाहून वडील संतोख सिंग गिल मुलीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या मुलीचे नाव त्यांच्या हातावर गोंदवले आहे. त्यांनी काढलेले टॅटूचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये असे दिसत आहे की, या टॅटूमध्ये प्रार्थनेसाठी हात जोडले आहेत. त्याचबरोबर गुलाब देखील आहे. इतकेच नव्हे, तर या टॅटूमध्ये मुलगी शहनाझचे देखील नाव मध्यभागी लिहिले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थची आई शहनाझला या दुःखद काळातून बाहेर काढण्यासाठी तिची पूर्ण काळजी घेत आहे. खरं तर, अशी माहिती समोर येत आहेत की, सध्या शहनाझ कोणाशी बोलत नाही, ती एकटी आहे आणि गप्प आहे. याच दरम्यान सिद्धार्थची आई तिची काळजी घेत आहे. इतकेच नव्हे, तर शहनाझला एक क्षणही एकटीला सोडत नाही. कारण सिद्धार्थच्या कुटुंबाला शहनाझने आपले आयुष्य या दुःखात घालवावे असे वाटत नाही.

माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थची आई रीटा यांनी शहनाझला कामावर परत जाण्यासाठी प्रेरित करत आहे. इतकेच नव्हे, तर रीटा या शहनाझला मित्रांना भेटायला सांगत आहे. जेणेकरून शहनाझ तिचे दुःख विसरून कामावर लक्ष केंद्रित करू शकेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.