‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर रितेश अन् जिनिलियाने धरला ठेका; मित्रमंडळींनीही दिली साथ


बॉलिवूड अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया देशमुख आता चित्रपटांमध्ये काम करताना दिसत नाही. मात्र, ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा कुटुंबीय आणि तिच्या मित्रांसोबतचे व्हिडिओ शेअर करते. तिचे चाहतेही जिनिलियाच्या प्रत्येक पोस्टची वाट पाहतात. ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अलीकडेच जिनिलियाने स्वतःचा आणि तिच्या मित्रांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या व्हिडिओमध्ये ती पती रितेश देशमुख आणि तिच्या जवळच्या मित्रांसोबत दिसत आहे.

अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रितेशशिवाय जिनिलियाने तिचा मित्र शबीर अहलुवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चौघेही धबधब्याच्या पाण्यात मजा करताना दिसत आहेत. तसेच, ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत असून त्यावर चौघेही डान्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना जिनिलियाने कॅप्शनमध्ये ‘टिप टिप बरसा पानी’ लिहिले आहे. यासोबतच शबीर आणि कांचीलाही टॅग केले आहे. या व्हिडिओला अवघ्या काही तासांत ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तिचे चाहते हार्ट आणि फायर इमोजींनी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिच्या या व्हिडिओला सोशल प्रचंड पसंती मिळत आहे.

रितेश देखमुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले, तर रितेश लवकरच ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचवेळी, जिनीलियाने लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांना आपला सर्व वेळ देत चित्रपटांपासून लांब गेली आहे. रितेश आणि जिनिलिया यांना दोन मुले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.