Monday, July 1, 2024

लंडनमध्ये लंच डेटचा आनंद लुटताना दिसले विराट अन् अनुष्का; व्हायरल होतोय रोमॅंटिक फोटो

सेलिब्रिटींना त्यांच्या कामामुळे परिवाराला वेळ देता येत नाही. मात्र जेव्हा या सेलेब्रिटींना क्वालिटी टाइम मिळतो, तेव्हा ते त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसतात. कलाकार अनेकदा जसा वेळ मिळेल तसा परिवाराला प्राधान्य देत, त्यांच्यासोबत वेळ घालवताना दिसतात. लंच, डिनरला जाणे, सुट्यांवर जाणे आदी गोष्टी ते या वेळात करतात. याचे अनेक फोटो पाहतो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कपल सध्या सर्वांच्याच आवडीचे झाले आहेत. हे दोघे त्यांचे लग्न आणि त्यांचे नाते अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळताना दिसत आहे. हे दोघं सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात.

नुकताच विराटने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक सेल्फी फोटो शेअर केला असून, यात तो त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये पाहिले तर ते दोघं लंच डेटला गेल्याचे दिसत आहे. त्यांच्यासमोर एका बाउलमध्ये Chickpea Salad देखील दिसत आहे. अनुष्का आणि विराट हे जगभरातील सर्वच लोकांचे आवडते कपल आहे. त्यांचा हा लंच डेटचा फोटो तुफान व्हायरल होत असून, फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट्स देत आहेत. मात्र या फोटोमध्ये त्यांची मुलगी वामिका दिसत नाहीये. या फोटोमध्ये विराटने ग्रे रंगाचे स्वेटशर्ट घातले असून, हातात गोल्डन घड्याळ घातले आहे. तर अनुष्काने काळ्या रंगाचा टि-शर्ट आणि गळ्यात A नावाचे पेंडंट चेनमध्ये घातले आहे. विराटने या फोटोसह सॅलडची प्लेट देखील शेअर केली आहे, ज्यात त्याने ओके चा ईमोजी देखील टाकला आहे. ( Virat Kohli Share Lunch Date Selfie With Wife Anushka Sharma )

सध्या विराट कोहली अनुष्का शर्मा त्यांच्या लेकीसह इंग्लंडमध्ये आहे. इंडियाला इंग्लंडमध्ये ४ ऑगस्टपासून ५ मॅचेसची टेस्ट सिरीज खेळायची आहे. मागील बऱ्याच काळापासून इंग्लंडमध्ये असलेली टीम इंडिया त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

अनुष्काने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक ग्रुप फोटो शेअर केला होता. ज्यात केएल राहुल, इशांन शर्मा, उमेश यादव, अभिनेत्री अथिया शेट्टी, प्रतिमा सिंग दिसत आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काची मुलगी वामिका देखील दिसत आहे. मात्र वामिकाचा चेहरा दिसत नाहीये.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील3

हे देखील वाचा