भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा हे सोशल मीडियावरील प्रसिद्ध कपल म्हणून ओळखले जाते. विराट आणि अनुष्काचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्यामुळेच त्यांच्या फोटोला काही तासातच लाखो लाईक्स मिळतात. नुकताच विराट कोहलीने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका सोबतचा ब्रेकफास्ट करतानाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. दोघांना वामिका नावाची एक मुलगी सुद्धा आहे. नुकताच विराट कोहलीने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत नाष्टा करतानाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अनुष्का आणि विराट कॅमेऱ्याकडे बघत हसताना दिसून येत आहेत, तर वामिकाची कॅमेऱ्याकडे पाठ आहे. या सुंदर फॅमिली फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत पसंती दर्शवली आहे. एका चाहत्याने विराटला मुलीचा चेहरा तरी दाखव अशी विनंती देखील केली. याचे कारण असे की, विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आजपर्यंत मुलगी वामिकाचा चेहरा दाखवला नाही. ते प्रत्येक फोटोत मुलीचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे वामिकाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
या क्यूट फॅमिली फोटोमध्ये अनुष्का शर्माने गडद निळ्या रंगाची डेनिम पँट आणि स्ट्राइप्ड टॉप घातला असून, पांढरे सँडल घातले आहे तर विराटने ग्रे रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाचे शॉर्टस घातले आहे. या दोघांच्यामध्ये वामिका तिच्या क्युट खुर्चीवर बसलेली दिसत आहे. त्यामुळे फक्त तिच्या दोन छोट्या आणि गोड वेण्याच कॅमेऱ्यात दिसत आहेत.
या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का वामिका सोबत एका रेस्टॉरंटमध्ये बसले असून, या फोटोसोबत विराटने सिंगल हार्ट ईमोजी शेअर केला आहे. याआधी अनुष्का शर्माने विराट आणि वामिकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये विराट कोहली वामिकाकडे प्रेमाने बघत हसताना दिसत होता. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ‘माझ संपूर्ण हृदय एकाच फोटोत’ अस सुंदर कॅप्शन दिले होते. अनुष्काने पोस्ट केलेल्या या फोटोला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. दरम्यान विराट कोहलीने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत पोस्ट केलेल्या या फोटोला ३ लाख २२ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी