Wednesday, July 3, 2024

‘केबीसी’च्या शानदार शुक्रवारमध्ये ‘दादा’ अन् ‘वीरू’ची हजेरी; बिग बींच्या प्रश्नांवर ‘अशाप्रकारे’ दिली उत्तरे

सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध प्रश्नमंजुषा शो असणारा ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ वे पर्व सुरू झाले आहेत. या पर्वात शोमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. सामान्यज्ञान वाढवणारा आणि सोबतच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा शो नुकताच सुरू झाला आणि प्रसिद्ध झाला. केवळ १५ प्रश्नांमध्ये सामान्य लोकांना करोडपती बनवणारा हा शो स्पर्धकांचे भाग्य बदलावणारा ठरतो. या पर्वात प्रत्येक शुक्रवार हा शानदार शुक्रवार म्हणून साजरा होणार आहे. या भागात अनेक मोठे व्यक्तिमत्व हा शोमध्ये हजेरी लावून हा खेळ खेळताना दिसणार आहे.

केबीसीचे १३ वे पर्व सुरू झाल्यानंतर पहिल्याच शानदार शुक्रवारी दोन दिग्ग्ज ‘दादा’ खेळाडू हॉटसीटवर बसून अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसणार आहे. हे खेळाडू आहेत, भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे प्रमुख सौरभ गांगुली आणि भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग. या भागाचा प्रोमो निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या भागात अमिताभ बच्चन आणि सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग खूपच मजामस्ती करताना दिसणार आहे.

या कार्यक्रमात सेहवाग आणि गांगुली जिंकणारी सर्व रक्कम समाजकार्यासाठी वापरणार आहे. या शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी या दोघांशी खूप गप्पा मारल्या. त्यांनी वीरेंद्र सेहवागला विचारले की, ” तु फलंदाजी करताना गाणे गातो का?” या प्रश्नाला उत्तर देताना सेहवागने आपले डोके हलवले आणि किशोर कुमारचे ‘चला जाता हूं किस की धुन में’ हे गाणे गायला. पुढे अमिताभ यांनी सेहवागला विचारले, “जर भारतीय संघ पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकला तर तुम्ही टीम इंडियासाठी कोणते गाणे गाता?” यावर, सेहवागने अमिताभ यांचा चित्रपट असणाऱ्या शहंशहा सिनेमातील प्रसिद्ध संवाद अमिताभ यांना म्हणण्याची विनंती केली. तेव्हा अमिताभ यांनी त्यांचा प्रसिद्ध संवाद म्हटलं, “रिश्ते मैं तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम हैं शहंशहा.”

 

अमिताभ यांनी सेहवागला ग्रेग चॅपेलला एक गाणे समर्पित करण्यास सांगितले. तेव्हा ते कोणते असेल? यावर सेहवाग म्हणतो की, “अपनी तो जैसे तैसे थोडी ऐसे या वैसे कट जायेगी आपका क्या होगा जनाब-ए-अली ” यावर गांगुली आणि अमिताभ दोघेही हसायला लागले. गांगुली आणि चॅपल यांच्यात खूप वाद होते. सौरभ गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी अमिताभ बच्चन यांना हॉटसीटवर बसवत सौरभ गांगुलीने त्यांना प्रश्न देखील विचारले.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे शोमध्ये कडक नियमांचे पालन केले जात आहे. त्यामुळे स्पर्धक आणि शोचे होस्ट यांच्यातील अंतर राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या पर्वात येणाऱ्या स्पर्धकांना अमिताभ यांना मिठी मारता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

हे देखील वाचा