महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जिंकला रे, ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर कोरले विशाल निकमचे नाव


कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ हा एक चर्चेत असणारा शो आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे हा शो बंद होता. अशातच ‘बिग बॉस मराठी‘च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता अखेर घोषित झाला आहे. मागील १०० दिवसांचा प्रवास करून विशाल निकम याने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर त्याचे नाव कोरले आहे. या बातमीने त्याचा चाहता वर्ग खूप खुश झाला आहे.

विशाल निकमने सुरुवातीपासूनच त्याने त्याची एक खास जागा निर्माण केली आहे. विशालने त्याचा फेअर गेम खेळून अवघ्या महाराष्ट्राला त्याच्या प्रेमात पाडले. चाहत्यांमध्ये देखील त्याचे खास स्थान निर्माण केले आहे. त्याने त्याची ही ट्रॉफी त्याच्या आईला समर्पित केली आहे. (Vishal nikam become winner of bigg Boss Marathi 3

त्याने त्याच्या खऱ्या मनाने आणि टास्कने सगळ्यांना त्याच्या प्रेमात पाडले. या बातमीने अवघा महाराष्ट्राला आनंद झाला आहे. त्याने हा शो जिंकावा अशी सुरुवातीपासूनच सगळ्यांची अपेक्षा होती. अखेर प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना तसेच मित्र परिवाराला खूप आनंद झाला आहे. घरात असताना विशाल, विकास, मीनल आणि सोनाली यांचा ग्रुप खूप गाजला. त्यांच्या मैत्रीने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. कार्याच्या बाबतीत विशाल नेहमीच उजवा ठरला आणि त्याचेच हे फळ आहे की, त्याने बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात त्याचे अढळ स्थान निर्माण केले आहे.

जय दुधाने हा ‘बिग बॉस मराठी ३’ चा उपविजेता झाला आहे. जय देखील या खेळात खूप चांगला खेळला आहे. परंतु त्याला विशालपेक्षा थोडा कमी पाठिंबा मिळाल्याने तो उपविजेता झाला आहे. त्याच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे.

हेही वाचा :

विकास पाटील ठरला बिग बॉस मराठीचा दुसरा रनरअप विजेता, विजेत्या पदासाठी आहेत ‘हे’ दोन दावेदार

बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार खासगी कार्यक्रमांना आणि लग्नांना हजेरी लावण्यासाठी घेतात कोट्यवधी रुपये

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून धाकड गर्ल बाहेर, मीनल शाह ट्रॉफीपासून झाली दूर  

 


Latest Post

error: Content is protected !!