Wednesday, June 26, 2024

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केले बंद; युजर्स म्हणाले, ‘याच दिवसाची वाट पाहत होतो…’

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चेचा विषय बनत असतात. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून आपला ठसा उमटवणारे विवेक अग्निहोत्री देशात सुरू असलेल्या कोणत्याही राजकीय आणि सामाजिक विषयावर आपले मत मांडण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण अलीकडेच विवेक अग्निहोत्रीने ट्विटरवरून सोशल मीडिया हँडलपासून अंतर ठेवल्याची माहिती दिली आहे, त्यानंतर युजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येऊ लागल्या आहेत. 

विवेक अग्निहोत्री यांनी निष्क्रिय केले ट्विटर
विशेष म्हणजे, विवेक अग्निहोत्री आपला जास्तीत जास्त वेळ ट्विटरवर घालवतात. ट्विटरच्या माध्यमातून ते प्रत्येक मुद्द्यावर आपली मते मांडतात. पण अलीकडे असे काय घडले काय माहित. ज्यामुळे विवेकने ट्विटर डिऍक्टिव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेक अग्निहोत्रीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेवटच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “माझ्यासाठी काहीतरी चांगले करण्याचा विचार करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे मी काही काळासाठी ट्विटर डिऍक्टिव्हेट करत आहे, लवकरच भेटू.” या ट्विटनंतर लोक असा अंदाज लावत आहेत की, कदाचित विवेक त्यांच्या आगामी चित्रपटांपैकी एकावर विचार करण्याची तयारी करत आहे. (vivek agnihotri deactivate his twitter account)

युजर्सच्या प्रतिक्रिया
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अशाप्रकारे निष्क्रिय केल्याची माहिती समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ज्याखाली एका ट्विटर यूजरने लिहिले आहे की, ‘तुमच्या पुढील प्रोजेक्टसाठी शुभेच्छा.’ आणखी एका युजरने ट्विट करून लिहिले की, ‘आणि या दिवसाची वाट पाहत होतो, ऑल द बेस्ट.’ तसेच, ‘काही काळ डिऍक्टिव्हेट करू नका, कायमचे करा, हे देश आणि लोकांच्या हितासाठी खूप चांगले होईल’, असेही एकजण म्हणाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा