Friday, March 29, 2024

The Kashmir Files | विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटाला आणखी एक मोठा झटका, ‘या’ ठिकाणी घालण्यात आली बंदी

साल १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाच्या वेदनादायक कथेवर आधारित विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) ब्लॉकबस्टर चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ने थिएटरमध्ये खूप धमाल केली होती. या चित्रपटाची जगभरात जोरदार चर्चा झाली. पण अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) अभिनित हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मात्र, हा चित्रपट वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. रिलीझपूर्वीच ‘द कश्मीर फाइल्स’ अनेक वादांमुळे चर्चेत आला होता. असे असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. पण आता बातमी येत आहे की, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी घालण्यात येणार आहे. याचे कारण चित्रपटात दाखविण्यात आलेली तोडफोड असल्याचे मानले जात आहे. हा चित्रपट शहर व राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे असल्याचे या अहवालात सांगण्यात येत आहे. अहवालात अधिकाऱ्यांनी सांगितले की, चित्रपटात मुस्लिमांचे चिथावणीखोर आणि एकतर्फी चित्रण केले आहे. यासोबतच काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम संघर्षात हिंदूंचा होणारा छळही एकतर्फी आहे, जे तेथील नियमांना अनुसरून नाहीये. (vivek agnihotri directed film the kashmir files to be ban in singapore)

अधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले आहे की, “चित्रपटात चित्रित केलेल्या गोष्टींमध्ये विविध समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याची आणि आमच्या एकसंध आणि बहु-धार्मिक समाजाची सामाजिक ऐक्य भंग करण्याची क्षमता आहे.” ते म्हणाले की, चित्रपट वर्गीकरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सिंगापूरमधील वांशिक किंवा धार्मिक समुदायांची बदनामी करणारा कोणताही कंटेट प्रेक्षकांसमोर प्रसारित करण्यास मनाई आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाला मार्चपासून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट काश्मीर खोऱ्यात ९०च्या दशकात दहशतवादामुळे झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे. अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा