Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड ऑस्कर २०२३ साठी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाची निवड, ‘या’ कलाकरांना देखील नामांकन

ऑस्कर २०२३ साठी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाची निवड, ‘या’ कलाकरांना देखील नामांकन

यावर्षी बॉलिवूडमधून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा ऑस्कर पुरस्कारांसाठी निवडला गेला आहे. चित्रपटांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी चित्रपटाची निवड होणे ही खूपच मोठी बाब आहे. जगातील सर्वात जास्त मानाच्या आणि मोठया समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारतीय चित्रपट आणि कलाकार असणे अभिमानाची गोष्ट आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा ऑस्करसाठी पात्र ठरला आहे. यासोबतच अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार या सर्व कलाकरांना सर्वोत्कृष्ट कलाकार या विभागात निवडण्यात आले आहे. याची माहिती खुद्द विवेक अग्निहोत्री यांनी दिली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाने ९५ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये पात्र फेरीत पूर्ण करत प्रवेश केला असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी ऑस्करसाठी जगभरातून ३०१ फिचर चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात भारतातल्या देखील काही चित्रपटांचा समावेश असून, त्यात ;काश्मीर फाईल्स’ सिनेमाचे देखील नाव आहे. या निवडीमुळे दिग्दर्शक आणि सिनेमाची पूर्ण टीम खूपच खुश आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर त्यांचा आनंद व्यक्त करत लिहिले, “एक मोठी घोषणा, ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाला ‘ द अकॅडमीने आपल्या पहिल्या यादीत ऑस्कर २०२३ साठी निवडले आहे. सर्वांना शुभेच्छा.”

यासोबतच विवेक यांनी अजून एक ट्विट करत ‘कश्मीर फाईल्स’ सिनेमातील अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार या कलाकारांची निवड देखील ऑस्करसाठी झाली आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, “अजून खूप दूर जायचे आहे. रास्ता लांब आहे. कृपया सर्वांना तुमचा आशीर्वाद द्या.” यावर्षी काश्मीर फाइल्ससोबत एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’, ऋषभ शेट्टी यांचा ‘कांतारा’ आणि संजय लीला भंसाली यांचा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ सोबतच गुजराती सिनेमा ‘द लास्ट फिल्म शो’, ‘छेल्लो शो’ असून, सोबतच मराठी मधील ‘मी वसंतराव’, ‘तुझ्यासाठी काहीही’ तर माधवनचा ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ आणि ‘विक्रांत रोना’ देखील सामील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल

हे देखील वाचा