शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी धावला ‘हा’ अभिनेता, आयआयटीमध्ये नंबर लागण्यासाठी अशी करणार मदत


विवेक ओबेरॉयने 18 वर्षांपूर्वी ‘कर्करोग पेशंट अँड असोसिएशन’ (सीपीएए) सोबत हातमिळवणी केली होती. तेव्हापासून त्याने खेड्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटूंबातील कर्करोगाशी झगडणाऱ्या सुमारे 2.50 लाखाहून अधिक मुलांना नि:स्वार्थ भावाने मदत केली आहे. नुकतेच, या अभिनेत्याने आता शैक्षणिक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत पात्र मुलांना 16 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचा खेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या मुलांना मोठा फायदा होईल. जेईई (JEE) आणि एनईईटी (NEET) परीक्षा देण्याचे स्वप्न पाहणार्‍या मुलांना या शिष्यवृत्तीमुळे मदत होईल.

आय ३० ट्रेनिंग प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू केली शिष्यवृत्ती
विवेकने शिष्यवृत्तीबद्दल सांगितले की, “जेव्हा जेव्हा खेड्यातील मुलं-मुली काही मोठे करतात तेव्हा ते केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे नाव घडवतात. आपल्या आजूबाजूला बरीच प्रशंसनीय आणि प्रतिभावान मुले आहेत. परंतु ते उच्च शिक्षण आणि कोचिंगला खर्च करण्यासाठी असमर्थ असतात. तसेच, आर्थिक अडचणींमुळे ते पसंतीच्या महाविद्यालयात देखील जाऊ शकत नाहीत.”

विवेक पुढे म्हणाला, “हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या जागेमुळे (ते कोठून आले आहेत) त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जावे, हे मला नकोय. माझी टीम आणि मी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून हा पुढाकार घेतला आहे. जेणेकरून ते बाहेर जाऊन आपलं करिअर घडवतील. शिष्यवृत्ती कार्यक्रम आय ३० (गणितज्ञ आनंद कुमार यांच्या सुपर 30 प्रोग्रामचे डिजिटायझेशन) प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आला आहे.

काय आहे आय३० प्रोग्राम
ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्यासाठी आय३० प्रोग्राम उच्च गुणवत्तेच्या आणि पुरोगामी मॉड्यूलचा वापर करतो. या अंतर्गत लहान शहरांमध्ये एकुण ९० व्हर्च्युअल लर्निंग सेन्टर्स उघडली गेली आहेत. जेणेकरून आयआयटी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी वर्गापर्यंत पोहचू शकतील आणि परवडणाऱ्या किंमतीत जेईई आणि नीटचा अभ्यास करू शकतील.


Leave A Reply

Your email address will not be published.