Wednesday, July 3, 2024

कोण जिंकणार वर्ल्ड कप? विवेक ओबेरॉयने टीम इंडियाबद्दल केले मोठे भाकीत; म्हणाले…

प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ‘क्रिश 3’ अभिनेता विश्वचषक विजेत्याबद्दल भविष्यवाणी करताना दिसत आहे. 2 नोव्हेंबर रोजी, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात विश्वचषक 2023 सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ स्टेडियममध्ये एकत्र मॅच एन्जॉय करताना दिसले. यावेळी कैफने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मोहम्मद कैफ टीम इंडियाच्या उत्कृष्ट फॉर्मबद्दल बोलताना दिसत आहे आणि तो विवेक ओबेरॉयला (Vivek Oberoi) भारतीय क्रिकेट संघाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. ज्यावर विवेक ओबेरॉय म्हणाले की, “‘मला वाटते की, या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला कोणीही हरवू शकत नाही. भारत यंदा एकही सामना न गमावता विश्वचषक जिंकेल, टीम इंडियाची ही विजयी मोहीम कोणीही रोखू शकत नाही.” अशाप्रकारे विवेक ओबेरॉयने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा चॅम्पियन म्हणून भारताच्या नावाची भविष्यवाणी केली आहे.

मोहम्मद कैफसोबत दिसलेला विवेक ओबेरॉयचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विवेकच्या या अंदाजाचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत. श्रीलंका आणि भारत यांच्यातील विश्वचषक सामना पाहण्यासाठी विवेक पूर्ण तयारीनिशी स्टेडियममध्ये पोहोचल्याची माहिती आहे. यावेळी त्याने टीम इंडियाची जर्सी घातली आणि इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओही शेअर केले.

भारतीय क्रिकेट संघाचा विजयाचा घोडा विजयी रथावर स्वार झाला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव करत आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 357 धावा केल्या. शुबमन गिलने 92 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 88 आणि श्रेयस अय्यरने 82 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने पाच बळी घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohammad Kaif (@mohammadkaif87)

श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचा पाठलाग करावा लागला. मात्र, श्रीलंकेचा संघ केवळ 13.2 षटकांत 19.4 ओव्हर्समध्ये 55 धावांत सर्वबाद झाला. मोहम्मद शमीने 5 तर मोहम्मद सिराजने 3 विकेट घेतल्या. या विजयासह टीम इंडियाने या विश्वचषकात सलग सातवा विजय मिळवला आहे. टीम इंडियाचे 14 गुण झाले आहेत आणि ते उपांत्य फेरीत प्रवेश करणारे पहिले संघ ठरले आहे. (Vivek Oberoi made big predictions about Team India about World Cup 2023)

आधिक वाचा-
अक्षया देवधरची सिनेसृष्टीत एंट्री; ‘या’ चित्रपटात झळकणार अभिनेत्री
FIRनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ओपन चँलेंज करतो जर मी…’

हे देखील वाचा