Tuesday, January 27, 2026
Home बॉलीवूड शूटिंगवेळी ‘वहीदा’ यांनी खरंच मारली होती ‘अमिताभ बच्चन’ यांच्या कानाखाली, वाचा काय होती बिग बींची प्रतिक्रिया

शूटिंगवेळी ‘वहीदा’ यांनी खरंच मारली होती ‘अमिताभ बच्चन’ यांच्या कानाखाली, वाचा काय होती बिग बींची प्रतिक्रिया

भारतीय सिनेसृष्टीवर तब्बल ३० वर्ष राज्य केलेल्या वहीदा रहमान यांचा नुकताच वाढदिवस झाला. ३ फेब्रुवारी १९३८ साली तामिळनाडूमध्ये वहीदा यांचा जन्म झाला. त्यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलुगु आणि बंगाली चित्रपटांमध्ये अभिनय केला. वहीदा यांनी त्यांच्या नृत्य आणि अभिनय या दोन्ही कलांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. यावर्षी वहीदा यांनी त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी त्यांच्या वयाची ६५ वर्ष या इंडस्ट्रीला दिली. एवढ्या मोठ्या करियरमध्ये त्यांच्या आयुष्यात अनेक लहान- मोठे किस्से घडल्या. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातला एक किस्सा सांगणार आहोत.

काही दिवसांपूर्वी वहीदा ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत शूटिंग करत असताना घडलेला एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा आहे ‘रेश्मा आणि शेरा’ चित्रपटाच्या शूटिंग वेळेचा. या सिनेमात वहीदा यांना अमिताभ बच्चन यांच्या गालात मारायचे होते. त्या शूटच्या आधी वहीदा या अमिताभ यांना मजेमध्ये म्हणाल्या होत्या, ‘मी तुमच्या गालात जोरात चापट मारेल.’ मात्र, शूटिंगच्या वेळी त्यांनी खरंच अमिताभ यांना जोरात गालात मारली. त्यानंतर अमिताभ यांचा चेहरा पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना जाणवले की, अमिताभ यांना जोरात मारले आहे.

शूट संपल्यानंतर अमिताभ यांनी वहिदा यांना म्हटले की, ‘वहीदा जी खूप चांगले होते.’ वहीदा यांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या करियरमध्ये अमिताभ यांच्या प्रेयसीसोबतच त्यांच्या आईचा देखील रोल साकारला.

वहीदा रहमान यांनी १९७४ साली त्यांच्या शशी रेखा या सहअभिनेत्यासोबत लग्न केले. त्यांना सोहेल आणि काशवी ही दोन मुलं असून, हे फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध लेखक आहेत. सन २००० साली वहीदा यांच्या पतीचे आजाराने निधन झाले. सध्या वहीदा मोठ्या पडद्यापासून दूर असल्या, तरी त्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत आहेत.

‘कागज के फूल’, ‘साहिब बीवी और गुलाम’, ‘गाईड’, ‘काला बाजार’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘राम और श्याम’ आणि ‘खामोशी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांच्या दर्जेदार अभिनयाची जादू त्यांनी पडद्यावर दाखवली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…आणि रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अमिताभ यांच्यावर खरोखरच गोळी झाडली’, वाचा संपूर्ण किस्सा

…नाहीतर आज ‘बच्चन’ ऐवजी ‘अमिताभ श्रीवास्तव’ नावाने बीग बींना मिळाली असती ओळख

‘दैनिक बोंबाबोंब’च्या प्रेक्षकांसाठी खास बातमी! अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना कॉलर ट्यून बंद; आता ‘या’ महिलेला ऐका

हे देखील वाचा