Friday, April 19, 2024

‘…आणि रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अमिताभ यांच्यावर खरोखरच गोळी झाडली’, वाचा संपूर्ण किस्सा

महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम सध्या टीव्हीवर सुरू आहे. या कार्यक्रमाचं बारावं पर्व सध्या सुरू आहे. या कर्यक्रमात प्रश्न विचारले जातात आणि योग्य उत्तर दिल्यानंतर स्पर्धक रक्कम जिंकत जातो. परंतु या कार्यक्रमामध्ये फक्त प्रश्नच विचारले जात नाहीत, तर बिग बी अमिताभ हे स्पर्धकांशी गप्पा मारतात सोबत त्यांचे चित्रीकरणातील काही किस्से असतात ते देखील स्पर्धकांसोबत शेअर करतात. असेच एक प्रीत सिंग नावाचे स्पर्धक अमिताभ यांच्यासमोर बसले. शोले सिनेमा प्रीत याना खूप आवडतं असल्याचे त्यांनी सांगितलं. यावर बोलता बोलता अमिताभ यांनी शोले सिनेमाच्या वेळचा एक किस्सा सांगितला. ज्यात थोडक्यात अमिताभ यांचा जीव वाचला होता.

सन १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटाच्या एका दृश्याबद्दल बोलताना, अमिताभ यांनी तो किस्सा सांगितला. जेव्हा क्लायमॅक्समध्ये धर्मेंद्र यांना काही दारुगोळा उचलण्याची गरज होती ज्यामध्ये अमिताभ यांनी साकारलेल्या विजयचा जीव वाचत असतो. अमिताभ म्हणाले, ‘जेव्हा आम्ही हा सिन शूट करत होतो, तेव्हा धर्मेंद्र जी खाली उभे होते आणि मी टेकडीच्या माथ्यावर उभा होतो. धर्मेंद्र यांना लवकरात लवकर दारू गोळा आणि बंदुकीच्या गोळ्या उचलून स्वतःकडे ठेवायच्या होत्या. परंतु जेव्हा जेव्हा ते गोळ्या उचालत होते त्या पुन्हा खाली पडत होत्या. यामुळे सिनचे सतत रिटेक वर रिटेक पडत होते. धर्मेंद्र सुद्धा सतत हा सिन करून वैतागले होते.’

यावर पुढे बिग बी म्हणाले, ‘धर्मेंद्र यांना इतका राग आला होता की त्यांनी गोळ्या उचलल्या आणि थेट गनमध्येच भरल्या. त्या खऱ्या गोळ्या होत्या. रागाच्या भरात त्यांनी बंदुकीचा चाप ओढला. मी टेकडीवर उभा होतो. त्यांनी चालवलेल्या गोळयांपैकी एक गोळी ही जणू माझ्या कानाला अक्षरशः चाटून गेली. ती खरी गोळी होती परंतु मी मात्र त्यादिवशी थोडक्यात बचावलो.’

आजमितीला शोले या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास ४५ वर्षे उलटून गेली आहेत. परंतु आज पर्यंत हा किस्सा कधी फारसा समोर आला नव्हता. केबीसीमुळे आपल्यापर्यंत अमिताभ यांचा हा किस्सा पोहोचला. महानायक अमिताभ बच्चन हे सध्या ७८ वर्षांचे आहेत. विचार करा जर त्या दिवशी धर्मेंद्र यांच्या रागामुळे काही अघटित घडलं असतं, तर हा महानायक आपल्या सिनेसृष्टीला लाभला नसता. सुदैवाने असं काही घडलं नाही. शोले हा सिनेमा पुढील अनेक पिढ्यांना असाच आनंद देत राहिला, यात काही शंका नाही.

हे देखील वाचा