कॉमेडी टेलिव्हिजन मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ २००८ पासून प्रसारित होत आहे. इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले. या टीव्ही मामध्ये दिलीप जोशीपासून (Dilip Joshi) ते बापूजीच्या भूमिकेत अमित भट्ट (Amit Bhatt) आणि बबिताच्या भूमिकेत मुनमुन दत्ता (Munmun Dutta) अशा एकापेक्षा एक व्यक्तिरेखा पाहायला मिळतात.
आज आम्ही तुम्हाला या टीव्ही मालिकेशी संबंधित एका वादाबद्दल सांगणार आहोत, जी एकेकाळी खूप चर्चेत होती. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, मालिकेचे मुख्य अभिनेते दिलीप जोशी आणि त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा ‘टप्पू’ म्हणजेच राज अनादकट (Raj Anadkat) यांच्यात सर्व काही ठीक नाही. (was dilip joshi and raj anadkat fight while shooting for taarak mehta ka ooltah chashmah)
सेटवर उशीर झाल्याबद्दल एकदा दिलीप यांनी राजला फटकारले होते, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप मालिकेचे सर्वात सीनियर अभिनेता आहेत, पण तरीही ते शूटिंगसाठी वेळेवर यायचे. मात्र, टप्पू अर्थात राज अनेकदा सेटवर उशिरा पोहोचला. असे बरेचदा घडू लागले, मग एके दिवशी राज अनादकटच्या या उशीरामुळे खुद्द दिलीप जोशी यांना तासभर वाट पहावी लागली. त्यामुळे संतापलेल्या दिलीप यांनी राजला खडसावून वेळेवर येण्याची सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, प्रसारमाध्यमांनी दिलीप जोशी यांच्याकडून या घटनेची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अभिनेत्याने असे काहीही घडले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्याचवेळी दिलीप जोशी यांनी अशा अफवा कोण पसरवत आहे, असेही म्हटले होते. मात्र, बातमीनुसार, राज अनादकट अजूनही दिलीप जोशींना इंस्टाग्रामवर फॉलो करत असताना, दिलीप जोशींनी त्याला अनफॉलो केले आहे.
मात्र राज अनादकट लवकरच या मालिकेतून बाहेर पडणार आहे. त्याची राहिलेली शूटिंग तो लवकरच पूर्ण करून ही मालिका सोडणार आहे. त्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, टप्पू म्हणजेच राज अनादकट मागील अनेक दिवसांपासून हा शो सोडण्याचा विचार करत होता. याबाबत त्याने प्रोडक्शन हाऊससोबत देखील बातचीत केली आहे. शेवटी त्याने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :