Thursday, April 24, 2025
Home अन्य दिया और बातीच्या संध्याचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल, वेस्टर्न लूकमध्ये ‘या’ गाण्यावर केलाय डान्स

दिया और बातीच्या संध्याचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल, वेस्टर्न लूकमध्ये ‘या’ गाण्यावर केलाय डान्स

सगळ्यांनाच दिया और बाती ही मालिका आणि यातली संध्या बिंदणी आठवतच असेलच. ही मालिका आणि यातली संध्या ही भूमिका साकारणारी दीपिका प्रचंड लोकप्रिय झाली. पहिल्याच मालिकेने दीपिकाला न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळवून दिली. दीपिकाने ही मालिका संपते तोपर्यंत मालिकेच्याच दिग्दर्शकाशी लग्न केले.

दीपिका आता एका मुलाची आई आहे. ती सध्या तिचे मदरहूड एन्जॉय करत असल्याने टेलिव्हिजनपासून सध्या लांब आहे, मात्र सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे. ती सतत तिचे वेगवेगळे व्हिडिओ फोटो पोस्ट करत असते. दीपिकाला डान्स खूप आवडतो, म्हणूनच ती तिच्या डान्सचे व्हिडिओ बऱ्यचदा पोस्ट करताना दिसते. नुकताच तिने तिच्या एका जबराट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

दोन क्युट वेण्या, लाल रंगाचा टॉप आणि ब्लॅक पॅन्टमध्ये व्रूम व्रूम गाण्यावर ती जोरदार डान्स करत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दीपिकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दीपिकाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, आता पर्यंत हा व्हिडिओ ६५ हजार नेटकाऱ्यानी पहिला असून अनेक फॅन्स या व्हिडिओवर कमेंट्स करत आहेत. दीपिकाचा डान्स आणि अंदाज सर्वांचं आवडत असून, अनेक लाइक्स या व्हिडिओला मिळत आहेत.

 

दीपिकाने दिया और बाती या मालिकेशिवाय, ‘द रियल सोलमेट’ ही वेबसिरीज आणि कलर्स वरील ‘कवच’ ही मालिका देखील केली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-
डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा कशी दिसते मिथुन यांच्या सुनबाई
एकेकाळी दीड हजारात डान्स शो करणारी  आंख्या का काजल  आज बनलीये कोट्यधीश
नोरा फतेहीचा  साकी साकी गाण्यावर एकदम कडक डान्स, पाहून चाहतेही झाले खुश
धनश्री वर्माने केला आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून पती युझवेंद्र चहलची मन जिंकणारी कमेंट

 

 

हे देखील वाचा