Wednesday, June 26, 2024

भारतातील दिग्गज राजकीय नेत्यांवर बनलेले ‘हे’ चित्रपट आयुष्यात एकदातरी पाहाच

भारतासारख्या खंडप्राय देशात नेहमी चर्चेसाठी अनेक मुद्दे समोर येत असतात. परंतु, राजकारण हा मुद्दा बारा महिने चर्चेचा असतो. यात निवडणुकांपासून ते मोर्च, आंदोलने सभा आदींचा समावेश होतो. मात्र, राजकारणाच्याबाबत सर्वाधिक चर्चा होते ती नेत्यांची. आणि अशा काही चर्चेतील नेत्यांवर चित्रपटसृष्टीत आजवर अनेक चित्रपट बनवले गेलेत.

भारतातील अनेक दिग्गज राजकारण्यांच्या आयुष्यावर आजवर बायोपिक आले आहेत. त्यांची राजकीय कहाणी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली आहे. या लेखात आपण असेच काही चित्रपट आणि नेते पाहणार आहोत, ज्यात दिग्गज राजकाऱ्यांची चरित्र आणि राजकीय कहाणी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली आहे.  

सरदार
भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे माजी पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारीत ‘सरदार’ हा चित्रपट १९९४ साली प्रसिद्ध झाला. केतन मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. परेश रावल यांनी या चित्रपटात वल्लभभाई पटेल यांची भुमिका साकारली होती.

अ‌ॅन सिग्निफिकेंट मॅन
खुशबू रांका आणि विनय शुक्ला दिग्दर्शित अ‌ॅन सिग्निफिकेंट मॅन ही राजकीय आणि सामाजिक विषयावर आधारीत डॉक्यूमेंट्री वर्ष २०१७ मध्ये प्रदर्शित झाली. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या जिवनावर आधारित या डॉक्युमेंट्रीत, आम आदमी पक्षाचा उदय आणि अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेने भारतीय राजकारणात कसा धुमाकूळ घातला याचे चित्रण केले आहे.

एन.टी.आर. कथानायकुडु
हा चित्रपट नंदामुरी तारक राव उर्फ एनटीआर यांच्या जीवनावर आधारित आहेत. ते अभिनेते, दिग्दर्शक आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हीने प्रमुख भुमिका साकारली आहे. विद्याने या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात एनटीआर यांचा अभिनेता ते नेता पर्यंतचा प्रवास दाखवला आहे.

द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर
हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चांगलाच वादात सापडला.

ठाकरे
हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपटही चांगलाच गाजला. यात नवाजउद्दिन सिद्दिकी यानी बाळासाहेब ठाकरेंचे मुख्य पात्र साकारले आहे. चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील काही प्रमुख घटना दाखवल्या आहेत.

थलायवी
वर्ष २०२१ मध्ये आलेला ‘थलायवी’ हा चित्रपट तमिळनाडूच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौतने जयललिता यांची भूमिका साकारली होती. कंगनाच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय यांनी केले होते. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ या भाषेत प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा 

हे देखील वाचा