Friday, June 14, 2024

‘सत्यप्रेम की कथा’चे पहिले गाणे आले समोर; कार्तिक अन् कियाराने शेतात केला रोमान्स

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीसत्यप्रेम की कथा‘मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहेत. ‘भूल भुलैया 2‘मध्ये या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. अशात आता साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शनच्या चित्रपटातील ‘नसीब से’ या पहिल्या गाण्याची पहिली झलक चाहत्यांसमोर आली आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा कार्तिक आणि कियाराची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

साजिद नाडियादवालाच्या टीमने ‘सत्यप्रेम की कथा’च्या पहिल्या गाण्याची झलक त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. टीमने चित्रपटातील ‘नसीब से’ या पहिल्या गाण्याचा छोटा टीझर शेअर केला, ज्यामध्ये कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन शेतात रोमान्स करताना दिसत आहेत.

या दोघांची केमिस्ट्री अगदी छोट्या झलकमध्येही दमदार दिसत आहे. याशिवाय चित्रपटाच्या गीत आणि संगीतात बरीच कनेक्टिव्हिटी आहे. हा व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “हमारे दिलों से आपके दिलों तक, नसीब मधील गाणे शनिवारी सकाळी 11 वाजता रिलीज होणार आहे”.

https://twitter.com/NGEMovies/status/1662028614949539840?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1662028614949539840%7Ctwgr%5E6fb1b58670d7d982c75f2eab1d7d528d74302a7c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fentertainment%2Fbollywood-satyaprem-ki-katha-first-song-naseeb-se-teaser-out-kartik-aaryan-and-kiara-advani-go-romantic-23424013.html

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ चे शूटिंग संपले आहे, ज्याचे अनेक फोटो निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. याशिवाय चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूक दोन्हीही समोर आला आहेत. अशात चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

समीर विध्वंस दिग्दर्शित ‘सत्यप्रेम की कथा’ 28 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. अशात अलीकडेच, कार्तिक आर्यनचा चित्रपटाच्या सेटवरून गाणे शूट करतानाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला, ज्यामध्ये अभिनेता निळ्या शर्टसह धोती परिधान केलेला दिसत आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटातील गाण्यांमध्ये साऊथ इंडियन फ्लेवर पाहायला मिळत असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे.(satyaprem ki katha movie first song naseeb se teaser out kartik aaryan and kiara advani go romantic )

हे देखील वाचा