Thursday, July 18, 2024

आज हरपलं देह भान! भगवी वस्त्र अन् भस्म लावून अक्षय कुमारने घेतले महाकालेश्वराचे दर्शन; पाहा व्हिडिओ

बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. अक्षय शनिवारी (9 सप्टेंबर) त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकताच अक्षयचा ‘ओह माय गॉड 2’ सारखा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकार अक्षयकडे पाहिले जाते. या खास प्रसंगी त्याने देवाचे दर्शन देखील घेतले आहे. आशीर्वाद घेण्यासाठी अभिनेता अक्षय महाकालच्या मंदिरात गेला होता. यावेळी त्यांचा मुलगा आरव, भाची सिमर आणि बहीण अलका हिरानंदानी हे देखील त्यांच्यासोबत होते.

या खास सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी अक्षय कुमार (Akshas Kumar) महाकालच्या पूजेसाठी पारंपारिक वेशभूषा धारण करून महाकाल आरतीमध्ये उत्साहाने सहभागी होताना दिसत आहे. अक्षय कुमारने (Akshas Kumar Videos) सकाळी महाकालच्या भस्म आरतीमध्ये सहभागी होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अक्षय व्यतिरिक्त भारतीय क्रिकेटर शिखर धवन देखील भगवान शंकराची पूजा करताना दिसत आहे. अक्षय कुमारचा हा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

अक्षय कुमार म्हणाला की, “मी देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली आहे” त्याला क्रिकेट विश्वचषकाबाबत प्रश्न विचारला असता अक्षय कुमार म्हणाला की, “विश्वचषक ही भगवान महाकालसाठी खूप छोटी गोष्ट आहे. देशाच्या प्रगतीसाठी आणि सर्वांच्या भरभराटीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.”

 अक्षय सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सध्या अनेक जण आपल्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत ​​आहेत. अक्षयच्या अलीकडील चित्रपट ‘ओह माय गॉड 2’ मध्ये त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली होती, जी चांगलीच चर्चेत आली.

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी काळात हा अभिनेता ‘मिशन रानीगंज’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘हेरा फेरी 3’ आणि ‘वेलकम 3’ सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अलीकडेच, अभिनेत्याच्या ‘मिशन रानीगंज- द भारत रेस्क्यू’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामुळे चाहत्यांची उसुक्ता शिगेला पोहोचली आहे. (Wearing saffron clothes and ashes, Akshas Kumar took darshan of Mahakaleshwar in a viral video)

अधिक वाचा-
‘जवान’ चित्रपटाला मिळणारे यश पाहून भारावून गेला शाहरुख खान; म्हणाला, ‘मी पुन्हा येईन…’
‘फॅमिली प्लॅनिंगबाबत आमचे कुटुंब आम्हाला…’ विकी कौशलने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा