Thursday, November 21, 2024
Home वेबसिरीज नोव्हेंबर ठरणार हाऊसफुल, ‘या’ धमाकेदार वेब सिरीज होणार प्रदर्शित

नोव्हेंबर ठरणार हाऊसफुल, ‘या’ धमाकेदार वेब सिरीज होणार प्रदर्शित

नोव्हेंबर महिना वेब सिरीजचा पाऊस घेऊन येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे अनेक शो सुरू होणार आहेत, जे प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज मनोरंजन देऊ शकतात. यामध्ये इंग्रजीतील अनेक वेब सिरीजचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया पुढील महिन्यात कोणती वेब सिरीज पाहायला मिळणार आहे.

ब्लॉकबस्टर
3 नोव्हेंबरला प्रदर्शित होणारी ही वेब सिरीज संपूर्ण कॉमेडी आहे. ही कथा एका व्यवस्थापकाची आहे जो अनेक अडचणींमध्येही आपले दुकान उघडण्याचा प्रयत्न करतो. ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफलिक्सवर रिलीज होणार आहे.

‘द ड्रैगन प्रिंस: मिस्ट्री ऑफ आरावोस’
‘द ड्रैगन प्रिंस: मिस्ट्री ऑफ आरावोस’ ही दोन राजकुमारांची कथा आहे. या मालिकेचे पहिले तीन भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. पहिल्या तीन मालिकांना चंद्र, आकाश आणि सूर्य म्हणतात. ही चौथी मालिका आहे, जी ‘अर्थ’ या थीमवर बनवण्यात आली आहे. ही वेब सिरीज 3 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

 

‘द फैबुलस’
ही एक कोरियन वेब सीरिज आहे, जिची कथा मैत्री, संघर्ष आणि रोमान्सभोवती फिरते. ‘आय एम नॉट अ रोबोट’ फेम चाय सू बिन द फॅब्युलसमध्ये दिसणार आहे. ही वेब सिरीज 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

‘ब्रीद: इनटू द शैडोज 2’
डिजिटल प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेला अभिषेक बच्चन(Amitabh Bachchan) ‘ब्रेथ: इनटू द शैडोज’च्या दुसऱ्या सीझनमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेचा ट्रेलर 27 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला होता. गेल्या सीझनची कहाणी जिथे संपली, तिथून या सीझनची कहाणी पुढे सरकली आहे. ब्रीद: इनटू द शॅडोज ही ऍक्शन, ड्रामा आणि ट्रॅजेडी असलेली सायकॉलॉजिकल थ्रिलर कथा आहे. दुसरा सीझन मयंक शर्माने दिग्दर्शित केला आहे. हा वेब शो प्राइम व्हिडिओवर 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रूह बाबा होणार ‘खूनी डेंटिस्ट’, कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’मधील फर्स्ट लूक व्हायरल

भेडियाच्या ठुमकेश्वरी गाण्यमध्ये श्रद्धच्या एंट्रीने केला कहर! चाहत्यांनी ‘स्त्री2’ चा लावला अंदाज

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा