बॉलिवूडची ‘ही’ जोडपी यावर्षी अडकली विवाहबंधनात, काहींनी गुपचूप केले लग्न तर काहींच्या लग्नाचा होता जोरदार बोलबाला


सध्या देशभरात लग्नाचा सीझन सुरू झाला असून, बॉलिवूडमध्येही वेगवेगळ्या लग्नांच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा आहे. हे जोडपे गुरुवारी (९ डिसेंबर) लग्नबंधनात अडकणार असून, ७ डिसेंबरपासून त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये ही जोडी या गोड बंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नासाठी शाही व्यवस्था करण्यात आली असून, कॅटरिना आणि विकीने त्यांचे लग्न खासगी राहण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे. कॅटरिना आणि विकीचे लग्न हे बॉलिवूडमधील या वर्षातले शेवटचे लग्न ठरू शकते. मात्र, याआधी अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी २०२१ मध्ये लग्न केले आहे. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणकोणते कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत.

वरुण धवन :

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने २४ जानेवारी रोजी गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न केले. या जोडप्याने अलिबागमध्ये सात फेरे घेतले जेथे करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

दिया मिर्झा :

सुंदर अभिनेत्री दिया मिर्झानेही याच वर्षी १५ फेब्रुवारीला लग्न केले. मुंबईत वैभव रेखीसोबतच्या या लग्नाला तिचे काही जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. निर्माता साहिल संघापासून घटस्फोट घेतल्यानंतर दियाचे हे दुसरे लग्न होते.

यामी गौतम :

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यामीने ४ जून रोजी चित्रपट निर्माता आदित्य धरसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. नंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचा खुलासा केला.

राजकुमार राव :

अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी १५ नोव्हेंबर रोजी देवउठनी ग्यारसच्या शुभ दिवशी सात फेरे घेतले. या लग्नात दोघांचे फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

रिया कपूर :

अनिल कपूर यांची धाकटी मुलगी आणि सोनम कपूरची बहीण रिया कपूरने यावर्षी १४ ऑगस्टला बॉयफ्रेंड करण भुलानीसोबत लग्नगाठ बांधली. दोघेही गेल्या १३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या लग्नातही मोजकेच जवळचे नातेवाईक आणि खास मित्र उपस्थित होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!