Tuesday, June 25, 2024

‘माझी मुलगी मला कधी कधी ओरडते’, रवीना टंडनचा मुलगी राशाबद्दल खुलासा; काय आहे कारण?

अभिनेत्री रवीना टंडन (Ravina Tandon) गेली अनेक दशकं आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर रवीनाने मनोरंजन विश्वात नाव कमावलं. एकामागोमाग बॉलिवूडला सुपरहिट सिनेमे देत तिने चाहत्यांच मनोरंजन केलं. पण रवीनानं रील्सच्या विश्वात येण हे तिची मुलगी राशा हिला आवडत नसल्याची माहिती समोर आली आहे.

रवीना टंडन काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली वेब सीरीज कॉलिंगमध्ये दिसवी होती. रवीना नेहमी प्रोफेशनल आणि वैयक्तिक जीवनामुळं चर्चेत असते. आता तिची मुलगी राशा चर्चेत आली आहे. राशा लवकरच अजय देवगन आणि त्याचा भाचा अमन देवगन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करत सिनेसृष्टीत एन्ट्री करणार आहे. अशातच रवीनाने एका मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारत काही खुलासे केले आहेत.

राशाला इंस्टाग्रामवर रील्स बनवणे आवडत नाही. यासाठी राशा मला कधी कधी ओरडती. अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा इन्स्टाग्रामचा विचार केला जातो. तेव्हा मी खुप गोंधळते. मला याबद्दल काहीही माहिती नाही. खरंतर रील बनवताना माझ्याकडून खूप चुका होतात. जेव्हा माझी टीम मला रील पोस्ट करण्यास सांगते, तेव्हा मी एक मजेशीर रील निवडते. कारण मला अशा रील आवडतात.

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी कलाकार आहे असा विचार न करता अशा रिल्स बनवते. मग राशा मला सांगते, ‘मम्मा, तू हे रील बनवू शकत नाहीस, ते चांगले नाहीत. पण मला रील खूप आवडतात.

रवीना पुढे म्हणाली की, काही महिन्यांपूर्वी जेव्हा ‘वाह’ ट्रेंड सुरू झाला तेव्हा मी त्यावर एक रीलही बनवली होती. राशाला ते आवडले नाही आणि तिने मला ते इंस्टाग्रामवरून काढून टाकण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर दीपिकाने या ट्रेंडवर रील काढली. मग मी ती रील राशाला शेअर केली अन् ‘हे बघ, सगळेच बनवत आहेत. असं म्हटलं.

रवीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, वेब सीरिज कर्मा कॉलिंगमध्ये दिसली होती. त्यामध्ये तिनं इंद्राणी कोठारीची भूमिका साकारली होती. ही सीरीज २६ जानेवारीला हॉटस्टारवर स्ट्रीम झाली. अपकमिंग प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बिग बॉसनंतर हे स्पर्धक ‘खतरों के खिलाडी १४ ‘मध्ये दिसणार; नावं झाली निश्चित ?
सलमान खान नंतर आता कुटुंबासह त्याच्या बहिणीच्या नवऱ्यालाही कडक सुरक्षा; काय आहे कारण?

हे देखील वाचा