Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान! प्रसिद्ध निर्माते काळाच्या पडद्याआड, कलाकार वाहतायत श्रद्धांजली

चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान! प्रसिद्ध निर्माते काळाच्या पडद्याआड, कलाकार वाहतायत श्रद्धांजली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते के.एस. सेतूमाधवन यांनी शुक्रवारी (२४ डिसेंबर) जगाचा निरोप घेतला आहे. ते ९० वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

सुपरस्टार कमल हासन यांनीही व्यक्त केला शोक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांनीही निर्माते के एस सेतूमाधवन (K S Sethumadhavan) यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “के.एस. सेतूमाधवन हे मल्याळम सिनेमाचा दर्जा ठरवण्यासाठी मूलभूत चाव्या होते. त्यांच्या कलात्मक कामगिरीसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. नमन.”

कमल हासन यांच्या या पोस्टवर चाहतेही सेतूमाधवन यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

मल्याळम व्यतिरिक्त त्यांनी तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे. सन २०१० मध्ये, केरळ सरकारने त्यांना सिनेमातील योगदानाबद्दल केरळ चित्रपट उद्योगातील सर्वोच्च सन्मान ‘जेसी डॅनियल पुरस्कारा’ने सन्मानित केले होते.

के. एस. सेतूमाधवन यांचा जन्म केरळमधील उत्तर पलक्कड जिल्ह्यात १९३१ मध्ये झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी वलसाला आणि तीन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा