Video: ‘जी फॉर गो कोरोना…’, म्हणत कॉमेडीच्या माध्यमातून जॉनी लिव्हर यांनी उडवली ऑनलाईन जगाची खिल्ली


जॉनी लिव्हर यांना प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ओळखले जाते. जॉनी दीर्घकाळापासून त्यांच्या अभिनय आणि मिमिक्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सुरुवातीला ते बॉलिवूड कलाकारांच्या मिमिक्रीने चाहत्यांना हसवायचे. तेव्हापासून त्यांची विनोदी शैली आजवर बदललेली नाही. आजपर्यंत प्रेक्षक त्यांच्या विनोदावर हसणे थांबवू शकत नाहीत. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आजच्या डिजिटल जगात मुले एबीसीडी कशी शिकतात, हे त्यांनी प्रेक्षकांना सांगितले आहे.

जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांनी आजच्या जगातील परिस्थितीचे स्पष्टीकरण दिले आहे. लहान मुलांवर ऑनलाईन जगाचा होणारा परिणाम त्यांनी स्पष्ट केला आहे. ‘प्राईज ऑफ द मोदी ईयर्स’ आणि ‘अवर हिंदू राष्ट्र’ यांच्यासारख्या पुस्तकाचे लेखक आकर पटेल यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

जॉनी लिव्हर यांची कॉमेडी त्या काळाची आठवण करून देते, ज्या काळामध्ये जॉनी यांनी जबरदस्त मिमिक्री करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आकर पटेल यांनी हा जॉनी लिव्हरचा हा व्हिडिओ शेअर करत ट्वीट केले की, “जॉनी लिव्हरने १९८० च्या दशकाच्या मध्यादरम्यान मिमिक्री करण्यास सुरुवात केली होती. तेच पहिले खरे स्टँड अप कॉमेडियन आहेत.”

हा व्हिडिओ ‘द कपिल शर्मा शो’ मधील आहे. या व्हिडिओमध्ये जॉनी लिव्हरसोबत वरुण धवन, सारा अली खान आणि राजपाल यादव त्यांच्यासोबत बसलेले दिसत आहेत. ऑनलाईन अभ्यास करणारी मुले ‘एबीसीडी’ कशाप्रकारे वाचतील हे त्यांनी एका विनोदी पद्धतीने स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. याद्वारे त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

जॉनी लिव्हर यांची गणना भारतातील प्रसिद्ध कॉमेडिनमध्ये होते. त्यांनी ‘कसम’, ‘जलवा’, ‘तेजाब’, ‘किशन कन्हैया’ यांसारख्या ३५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॉनी लिव्हर यांचे बालपण मुंबईत धारावी येथे गेले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जॉनी लिव्हर यांनी मुंबईच्या रस्त्यावर पेन विकण्यापासून ते बॉलिवूड कलाकारांची नक्कल करेपर्यंत अनेक गोष्टी केल्या आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!