‘तू माझ्यावर कधीच…’, म्हणत संतापली तेजस्वी प्रकाश, तर ढसाढसा रडू लागला करण कुंद्रा


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त असलेला शो म्हणून ‘बिग बॉस‘ला ओळखले जाते. या शोचे सध्या १५ वे पर्व सुरू आहे. या शोच्या प्रत्येक पर्वात कुणी ना कुणी नवीन कपल बनते. अशातच या पर्वात करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशने कपल म्हणून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले आहे. तसेच चाहत्यांनाही त्यांची ही जोडी खूपच आवडली आहे. मात्र, आता असे काही झाले आहे की, ज्यामुळे दोघांनीही चाहत्यांचे हृदय तोडले आहे.

या शोमध्ये सध्या ‘तिकीट टू फिनाले’ स्पर्धा सुरू असून यावेळी राखी सावंतनंतर (Rakhi Sawant) दुसऱ्या फायनलिस्टचा शोध सुरू आहे. या शर्यतीमुळे अनेक नाती तुटण्याच्या मार्गावर आहेत.

या यादीत करण (Karan Kundra) आणि तेजस्वीच्या (Tejasswi Prakash) नावाचा समावेश आहे, निदान शोचा लेटेस्ट प्रोमो बघितला तरी एवढेच वाटते. शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये करण आणि तेजस्वी यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळते. या भांडणाच्या वेळी तेजस्वी रागाने असे काही बोलते, जे ऐकून करण ढसाढसा रडू लागतो.

तेजस्वी करणला म्हणते की, “तू माझ्यावर कधीच प्रेम केले नाहीस.” यानंतर निशांत भट्टजवळ बसून करण खूप रडतो आणि म्हणतो की, “ज्या मुलीसाठी तो ८ महिने उभा होता. तिनेच शेवटी प्रेमावर प्रश्न उपस्थित केले.”

पर्वाच्या सुरुवातीपासूनच करण आणि तेजस्वीची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत होती. मात्र, आता लेटेस्ट प्रोमो पाहून चाहते नाराज होऊ शकतात. जर या पर्वाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या पर्वाला राखीच्या रूपात पहिला फायनलिस्ट मिळाला आहे आणि लवकरच शोला या पर्वाचा दुसरा फायनलिस्ट देखील मिळू शकतो.

तेजस्वी प्रकाशबद्दल बोलायचं झालं, तर तिचं पूर्ण नाव हे तेजस्वी प्रकाश वायंगणकर आहे. तिचा जन्म १० जून, १९९३ रोजी जेदाह, सौदी अरेबिया येथे झाला आहे. जन्म जरी परदेशात झाला असला, तरीही ती एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. ‘स्वरागिनी- जोडें रिश्तों के सूर’मध्ये रागिणी माहेश्वरीच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. २०२० मध्ये, तिने ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी १०’मध्ये भाग घेतला होता.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!