Saturday, June 29, 2024

एवढा पैसा-प्रसिद्धी कमवूनही रेखाला आहे ‘या’ गोष्टीचा खेद, जाणून तुम्हीही व्हाल भावूक

हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री म्हणजे रेखा. निखळ सौंदर्य, अन् जिची एकच नजर करते समोरच्याला घायाळ, अशा या रेखा यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयानं आख्खं बॉलिवूड गाजवलं. पण रेखांच्या बाबतीत एक गोष्ट ही तितकीच खरीये की, एवढी सुंदर असूनही त्या आजही एकट्याच आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनय करिअरमध्ये यशाचं शिखर गाठलं. परंतु त्यांना एका गोष्टीचा खेद मात्र नेहमीच आहे. त्याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणी येत असतं. असंच काहीसं रेखांच्याही बाबतीत आहे. रेखांच्या आयुष्यात एक नाही, तर अनेक ऍक्टर्स आले, बिझनेसमनही आले. पण तिचे रिलेशनशिप मात्र खास काही यशस्वी झालेच नाही.

रेखांचं सर्वात चर्चेत राहिलेलं रिलेशनशिप म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं. रेखांनी अनेक मुलाखतींमध्ये बिग बींचे नाव न घेता त्यांचा उच्चार केला तसेच तिच्यासाठी बिग बी हे देवासारखे होते. मात्र, बिग बींनी कधीच मीडियासमोर या रिलेशनशिपबद्दल एक शब्दही काढला नाही. असे म्हटले जाते की, रेखांनी अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबत लग्नही केले होते. पण मंडळी अपवाद वगळता जसे मुलाच्या आईला आपल्या मुलाने घरी आणलेली सून आवडत नसते, तसेच काहीसे विनोद मेहरांच्या आईबाबतही होते. त्यांनी रेखा आणि विनोद यांचे लग्न मान्य केले नाही.

त्यानंतर रेखाने मुकेश अग्रवाल यांच्याशी तिने लग्न केले. मुकेश हे व्यवसायाने बिझनेसमन. पण रेखांच्या नशिबात मुकेश यांचंही प्रेम नव्हतंच. मुकेश यांनी रेखांच्याच ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं होतं.

असे म्हटले जाते की, काही काळासाठी रेखा या सुपरस्टार संजय दत्तसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. तसेच, त्यांचे नाव अभिनेते किरण कुमार यांच्यासोबतही जोडले गेले होते. पण मंडळी विचार करा एवढे रिलेशनशिप होऊनही रेखा आजही एकट्याच आहेत. याच एकटेपणामुळे त्या आपली एक इच्छा पूर्ण करू शकल्या नाहीत. त्याबाबत त्यांनी आपल्या एका मुलाखतीत मोकळेपणानं सांगितलं होतं. ते म्हणजे स्वत:च्या पोरा- बाळांबद्दल.

शेवटी आई बनणं हे स्त्रीचं भाग्यच. तिलाही वाटतं आपण आई बनलं पाहिजे. पण रेखा याबाबतीत दुर्दैवच म्हणावं लागेल. रेखा यांना नेहमीपासूनच आई बनायचं होतं. त्यांच्या आईने रेखांना एक सल्ला दिला होता की, ३० वर्षांच्या वयात आई बनणं योग्य असतं. रेखा हे वयाच्या तिसाव्या वर्षी करू शकल्या नाहीत. परंतु एका इंटरव्ह्यू दरम्यान सांगितलेलं की, त्यांना भविष्यात नक्कीच आई बनायचंय. पण एकाच अटीवर. ती म्हणजे त्यांना लग्न न करता आई बनायचंच नव्हतं. साहजिक आहे की, रेखांचं रिलेशनशिप दीर्घकाळ चालले त्यात सर्वकाही शक्य होते, पण लग्न नव्हते.

त्यांनी असंही म्हटलं की, त्यांना प्रायव्हसी आवडते, पण त्यांच्या घरातील एकटेपणा त्यांना आता नकोसा झालाय. त्यांना वाटतं की, घरात मुलं असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वातावरणच आनंदाचं होतं. विशेष म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की, त्यांना केवळ एक नाही, तर कमीत कमी १२मुलं तर पाहिजेतच. तसंच त्यांनी १९८४ च्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, माझं लग्न होऊ शकलं नाही, आणि मला मुलंबाळं झाली नाहीत. मी पाहते की, माझ्या बरोबरच्या अभिनेत्रींनी संसार थाटलाय. त्या सर्वांना मुलंबाळं झालीत, आणि एकीकडं मी एकटीचंय. त्यांनी असंही म्हटलं होतं की, एक स्त्री आई बनल्याशिवाय कधीही पूर्ण बनत नाही. ज्या व्यक्तीवर मी प्रेम करते, त्याच्याशी माझं लग्न झालं, तर मी नक्कीच लग्न करेल. पण लग्नाविना मी हा मोठा निर्णय कधीच घेणार नाही.

पुढे रेखांनी म्हटलं की, मी जरी मॉडर्न विचाराची असले, तरीही लग्न आणि मुलांच्या बाबतीत मी ओल्ड फॅशनची आहे. जोपर्यंत कोणाशी लग्न होत नाही, तोपर्यंत त्या कोणाशीही लग्न करणार नाहीत. लग्नाविना त्यांना मुलबाळ नकोच आणि याच एका गोष्टीचा खेद त्यांना आहे.

हेही पाहा- श्रीमंती, प्रसिद्धी सगळं असूनही रेखांचं आयुष्य मात्र वाळवंटचं राहिलं

रेखांकडे अमाप संपत्ती आहे, यात तीळमात्र शंका नाही. परंतु आजही रेखांचं आयुष्य हे एका वाळवंटाप्रमाणे आहे. त्या मुंबईतील आपल्या बंगल्यात एकट्याच राहतात. त्यांच्या बंगल्यावर जास्त लोकांचा गराडा नसतोच. त्यांचं सर्व काम त्यांची सेक्रेटरी फरजाना पाहतात. रेखांच्या आयुष्यातील सर्वाधिक गुपीतं हे फरजाना यांनाच माहिती आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयुष्यातील पहिल्या शूटिंगवेळी रेखासोबत घडले असे काही की, ऐन शूटिंगमध्ये रडायला लागली अभिनेत्री
अभिनेता करण कुंद्राने मुंबईत खरेदी केले कोट्यवधी किंमतीचे आलिशान घर, किंमत व्हाल हैराण

हे देखील वाचा