Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड ‘डर’पासून ते ‘पद्मावत’पर्यंत, अजय देवगणला झाला ‘या’ चित्रपटांना नाही म्हणण्याचा पश्चाताप!

‘डर’पासून ते ‘पद्मावत’पर्यंत, अजय देवगणला झाला ‘या’ चित्रपटांना नाही म्हणण्याचा पश्चाताप!

अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgan) 1991 मध्ये ‘फूल और कांटे‘ या चित्रपटाद्वारे चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. अजय देवगण त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. अलीकडेच त्याला त्याच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजयने त्याच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. यासोबतच त्याने असे अनेक चित्रपट सोडले आहेत, जे प्रदर्शित झाल्यानंतर सुपर डुपर हिट ठरले. या चित्रपटांना नाही म्हटल्यावर, अजय देवगणला त्याच्या निर्णयाचे वाईट नक्कीच वाटले असेल.

डर
शाहरुख खानने ‘डर’ केल्यानंतर तो रातोरात स्टार झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलच्या भूमिकेसाठी अजय देवगण चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण अजय देवगणने तारखा नसल्यामुळे काम करण्यास नकार दिला. (when actor ajay devgn refused to work in these hits)

करण अर्जुन
‘करण अर्जुन’ हा सलमान खानच्या कारकिर्दीतील अतिशय शानदार चित्रपट मानला जातो. १९९५ मध्ये आलेल्या या चित्रपटात करणच्या भूमिकेसाठी राकेश रोशनची पहिली पसंती अजय देवगण होता. पण राकेश रोशनसोबतच्या काही रचनात्मक मतभेदांमुळे अजयने चित्रपटातून बाहेर पडला.

कुछ कुछ होता है
१९९८च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कुछ कुछ होता है’साठी अजय देवगणच पहिली पसंती होता. अजयला चित्रपटाची कथा आवडली नाही आणि त्याने चित्रपट करण्यास नकार दिला. पुढे या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

बाजीराव मस्तानी
‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट रणवीर सिंगच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटासाठी रणवीर दिग्दर्शकाची पहिली पसंत नव्हता. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी रणवीर सिंगच्या आधी अजय देवगणकडे ही भूमिका नेली होती. तारखांच्या समस्येमुळे अजय देवगणने ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

पद्मावत
जेव्हा संजय लीली भन्साळी यांनी ‘पद्मावत’मध्ये काम करण्याचा विचार केला, तेव्हा अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी अजय देवगण संजयची पहिली पसंती होता. अजय देवगणच्या व्यस्त शेड्युलमुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. यानंतर रणवीर सिंगने ही भन्नाट भूमिका साकारली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती.

निक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हाेणाऱ्या जावायासाेबत बाेनी कपूर यांनी दिली पाेज? एकदा ‘ताे’ व्हिडिओ पाहाच

वात्सल्य, परंपरा, शिस्त गुंफत आले! अभिनेत्री राधिका देशपांडेने ‘त्या’ पोस्टमधून व्यक्त केली मायलेकीच्या नात्याची वीण

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा