Wednesday, December 3, 2025
Home बॉलीवूड जेव्हा रीना रॉय यांनी दिली होती शत्रुघ्न सिन्हा यांना धमकी, म्हणाल्या होत्या ‘8 दिवसात लग्न केले नाही तर…’

जेव्हा रीना रॉय यांनी दिली होती शत्रुघ्न सिन्हा यांना धमकी, म्हणाल्या होत्या ‘8 दिवसात लग्न केले नाही तर…’

चित्रपटात कधी आशा बनून तर, कधी नागीन होऊन रीना रॉय चाहत्यांच्या भेटीला आल्या. वयाच्या 15 व्या वर्षांपासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय यांनी 90 च्या दशकात अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आणि यश मिळवले आहे. त्यावेळी सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी त्यांच्या नात्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती. या दोघांनीही बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, आणि यादरम्यान ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते. शत्रुघ्न सिन्हा आणि रीना यांनी लवकरच या प्रेमाला पूर्ण करण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण, यादरम्यान पूनम यांची एंट्री झाली.

शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय आणि पूनम सिन्हा यांनी ‘हथकडी’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. चित्रपटाचे निर्मातेही 3 प्रेमींमध्ये अडकले होते. इतकेच नव्हे तर, तणाव इतका वाढला होता की, रीना रॉय यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना पुन्हा तुम्ही पूनम यांच्याबरोबर काम करणार नाही, अशी धमकी दिली होती. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्याशी लग्न केले नाही, तर येत्या 8 दिवसांत त्या कोणाशीही लग्न करतील अशीही धमकी रीना यांनी दिली होती.

शत्रुघ्न यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या ‘हतकडी’ चित्रपटाचे निर्माते पहलज निहलानी यांनी पूनम यांचे ​​समर्थन केले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, पहलज निहलानी आपल्या मुलाखतीत म्हणाले होते की, “हतकडीनंतर शत्रुघ्न, रीना आणि संजीव कुमार यांना मी माझ्या पुढच्या आंधी तूफान चित्रपटासाठी कास्ट करण्यासाठी खूप उत्सुक होतो. पण रीना मला म्हणाल्या, ‘तुमच्या मित्राला मनापासून सांगायला सांगा. त्यांनी माझ्याशी लग्न केलं नाही, तर मी आठ दिवसांत कोणाशीही लग्न करेल. ते त्यांचा निर्णय सांगतील, तेव्हाच मी या चित्रपटासाठी काम करायला तयार होईल, असं माझं मत आहे.'”

काही काळापूर्वी शत्रुघ्न सिन्हा आपली पत्नी पूनम सिन्हा यांच्यासमवेत ‘द कपिल शर्मा शो’ येथे दाखल झाले होते. तिथे दोघांनीही आपल्या पहिल्या भेटीबद्दलचा किस्सा चाहत्यांसमोर उघड केला होता. त्या म्हणाल्या की, “आमच्या दोघांची पहिली भेट पटनाहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये झाली होती. मी तेव्हा नातेवाईकाच्या लग्नातून परत येत होते. त्यावेळी मी आणि शत्रुघ्न दोघेही अस्वस्थ होतो. मला आईने फटकारल्यामुळे मी ट्रेनमध्ये रडत होते आणि आई-वडिलांना सोडून येताना शत्रुघ्न दु:खी झाले होते.”

‘कालीचरण’ चित्रपटातून रीना रॉय यांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, त्यांनी परत कधीच मागे वळून बघितले नाही. त्यावेळी या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हापण होते. यानंतर या दोघांची जोडी एवढी नावाजली गेली की, पुढे त्यांची खूप चर्चा झाली होती.

शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा 1980 साली लग्नबंधनात अडकले होते. त्यांना सोनाक्षी, लव आणि कुश असे 3 अपत्य आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘या’ सवयीने हैराण झालेल्या शशी कपूर यांनी रागाच्या भरात शॉटगन यांना केली होती मारहाण
‘या’ दिग्गज कलाकारांचे सुरुवातीचे वेतन ऐकूण व्हाल थक्क, अगदी शुन्यातून केली होती सुरुवात

हे देखील वाचा