‘या’ चिमुकल्याच्या उपस्थितीत गायले होते ‘बिग बीं’नी पहिल्यांदा गाणे; आज आहे मोठा सुपरस्टार


बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘महानायक’ ही उपमा उगाच मिळाली नाही, त्यासाठी त्यांनी तेवढे कष्ट घेतले आहेत. अभिनयासोबत त्यांना गाण्यात देखील खूप रस आहे. अमिताभ बच्चन जेव्हा गातात किंवा त्यांची कविता वाचतात, तेव्हा ऐकणारा व्यक्ती त्यांच्यातच दंग होऊन जात असतो. आज त्यांच्या अभिनयासोबत त्यांचा आवाजही त्यांची ओळख बनली आहे. त्यांनी त्यांचे सुपरहिट चित्रपट ‘सिलसिला’, ‘कभी कभी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यांसारख्या चित्रपटात गाणी गायली आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटासाठी त्यांचे पहिले गाणे गायले होते. ‘मेरे पास आओ’ हे त्यांच्या पहिल्या गाण्याचे बोल होते. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक राजेश रोशन हे होते. त्यांचा सराव चालू असायचा. या सगळ्या घटनांचा एक लहान मुलगा साक्षीदार होता, जो तिथे बेंचवर बसून त्यांचा सराव खूप काळजीपूर्वक बघत असायचा. (When Amitabh Bachchan sung his first song Hrithik Roshan was present there)

खरं तर अमिताभ बच्चन यांचे गाणे ऐकून सगळेच मंत्रमुग्ध होत असायचे. परंतु तो लहान मुलगा अवाक् झाला होता. तो लहान मुलगा होता ऋतिक रोशन. त्याचा हा फोटो पाहून त्याला ओळखणे देखील कठीण होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा हा संगीत सराव करतानाचा एक थ्रोबॅक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. तसेच त्यांनी अगदी मजेशीर अंदाजात सगळ्या घटना सांगितल्या आहेत. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी असा विचार देखील केला नव्हता की, ते एक दिवस या लहान मुलासोबत चित्रपटात काम करतील. अमिताभ बच्चन आणि ऋतिक यांनी ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘लक्ष्य’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

अमिताभ बच्चन यांचा 1979 मध्ये आलेला ‘मिस्टर नटवरलाल’ हा एक सुपरहिट चित्रपट ठरला होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, रेखा, कादर खान यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. राजेश रोशन यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटाच्या नावावरून खूप वाद उभे राहिले होते.

विशेष म्हणजे ऋतिक हा राजेश रोशन यांचा भाऊ आणि दिग्गज अभिनेते राकेश रोशन यांचा मुलगा आहे. या ओळखीव्यतिरिक्त त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तो एक सुपरस्टार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?

-‘इतके पैसे कसे कमवता?’, कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नावर राज कुंद्राने दिली होती ‘अशी’ रिऍक्शन

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.