Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘जेव्हा आयुष्य परीक्षा घेत होते तेव्हा मलायकाने मला मजबूत केले’, अर्जुन कपूरने केला अनुभव शेअर

‘जेव्हा आयुष्य परीक्षा घेत होते तेव्हा मलायकाने मला मजबूत केले’, अर्जुन कपूरने केला अनुभव शेअर

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. २०१९ मध्ये, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले. अर्जुन कपूर येण्यापूर्वी मलायकाच्या आयुष्यात अरबाज खान होता. मलायका आणि अरबाजचे लग्न १९९८ मध्ये झाले होते आणि लग्नाच्या १९ वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. या लग्नापासून मलायका आणि अरबाजला अरहान खान हा मुलगाही आहे.

मात्र, अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर मलायकाची अर्जुन कपूरसोबतची जवळीक वाढली. मलायका आणि अर्जुनचे नाते कसे आहे याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, “मलाइकाने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले आहे, तेही अशा वेळी जेव्हा आयुष्य माझी परीक्षा घेत होते. अर्जुन कपूरच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आणि मलायकाच्या नात्यात मैत्री प्रथम येते आणि दोघेही कोणत्याही विषयावर खुलेपणाने बोलतात.

मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या वयात १२ वर्षांचे अंतर आहे. मलायकालाही या वयातील अंतरामुळे अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. याबाबत अर्जुन कपूरनेही खुलेपणाने मत व्यक्त केले आहे.

अर्जुन कपूरच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर पसरलेल्या या द्वेषातून बाहेर यायला त्याला आणि मलायकाला वेळ लागला. अभिनेत्याच्या मते, त्या कठीण काळातही तो आणि मलायका एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. अर्जुन कपूर म्हणतो की, मलायकाला हे नाते सार्वजनिक केल्यानंतर इतका त्रास सहन करावा लागला याचे मला दुःख आहे. मात्र, मलायकाने त्याला आणि त्याच्या नात्याला इतका सन्मान दिल्याने अभिनेता खूप खूश आहे.

अनेकवेळा या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचे फोटो काहींना आवडतात तर काहीजण मात्र त्यांना जोरदार ट्रोल करतात. परंतु ते त्यांच्यातील वयाला न जुमानता त्यांच्यातील प्रेम कायम ठेवतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा