Thursday, July 18, 2024

Accident | अपघातानंतर समोर आली मलायका अरोराची पहिली झलक, ‘अशी’ झालीय अभिनेत्रीची हालत

बॉलिवूड इंडस्ट्री असो किंवा टीव्ही इंडस्ट्रीचे चाहते, आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो करतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देतात. आपला आवडता स्टार अडचणीत आला, तर त्याचे चाहतेही नाराज होणार, हे साहजिकच आहे. सध्या मलायका अरोराच्या (Malaika Arora) चाहत्यांचीही अशीच अवस्था आहे. मलायका अरोराच्या कारला नुकताच अपघात झाला होता, त्यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

व्हिडिओ आणि फोटो आले समोर
अपघातादरम्यान अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्यामुळे डॉक्टरांनी तिला २४ तासांपेक्षा जास्त काळ निरीक्षणाखाली ठेवले होते. मात्र, आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या अपघातानंतर आता अभिनेत्रीची पहिली झलक समोर आली आहे. खरं तर, मलायकाचे रुग्णालयातून डिस्चार्ज देतानाचे अनेक फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समोर आलेल्या झलकमध्ये अभिनेत्रीच्या डोक्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे. गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये ती व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. तसेच तिच्या आजूबाजूचे लोक तिला मदत करताना दिसत आहेत. (actress malaika arora injured in accident first glimpse viral fans worried)

ट्रॅफिकमुळे झाला अपघात
मलायका अरोराच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितले होते की, मलायकाच्या डोक्यात टाके पडले आहेत, पण तिला आता पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. तिच्या डोक्याला फारशी दुखापत झालेली नाही. अपघाताच्या वेळी, मलायका तिच्या रेंज रोव्हर कारमध्ये एका कार्यक्रमातून घरी परतत होती. त्यावेळी मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोल प्लाझाजवळ ट्रॅफिकमुळे काही गाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यापैकी एक मलायका अरोराची कार देखील होती.

मलायकाच्या प्रकृतीबाबत तिच्या बहिणीने अमृता अरोराने खुलासा केला असून तिला आरामाची गरज असल्याची माहिती दिली आहे. या गंभीर अपघातात मलायकाच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात मलायकाने कोणतीही तक्रार दाखल केली नसली तरी या घटनेचा पोलिस तपास होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा