Friday, July 5, 2024

शालेय दिवसांमध्ये श्रद्धा करायची परिक्षेत चीटिंग? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

श्रद्धा कपूर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तू झुठी मैं मक्कार‘ या चित्रपटामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसाेबत रणबीर कपूर असून या दाेघांच्या जाेडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 15.73 कोटींची कमाई करून हा चित्रपट वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. मात्र, चित्रपटाची दुसऱ्या दिवशी त्याच्या व्यवसायात घट झाली. अशात तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने वेग पकडला आणि चांगली कमाई केली. यादरम्यान श्रद्धा कपूर स्वतःबद्दल एक मोठा खुलासा करताना दिसली आहे, ज्याने चाहतेही थक्क झाले आहेत. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

श्रद्धा कपूर (shraddha kapoor) चित्रपट रिलीज झाल्यानंतरही ‘तू झुठी मैं मक्कर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचे शालिये दिवस आठवले. यासोबतच श्रध्दाने परीक्षेत चीटिंग करताना पकडलेली घटना देखील सांगितली.

एका मुलाखती दरम्यान, श्रद्धा कपूर बालपणीच्या गाेष्टी सांगत म्हणाली, “आपण सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या परीक्षेत चीटिंग केली आहे. मी स्वतःबद्दल खूप निराश झाली होती. मी माझी उत्तरे माझ्या पिनाफोरमध्ये लिहून ठेवली आणि मला वाटले की, किती छान कल्पना आहे कोणीही मला पकडू पण शकणार नाही.”

यानंतर श्रद्धा कपूर चीटिंग करताना आलेला मजेदार ट्विस्ट शेअर करत म्हणाली, “मी उत्तर पाहत होती आणि माझ्या शेजारी माझे शिक्षक उभे होते. मी असे होते की, अहो मला माहित आहे की, मला उत्कृष्ट गुण मिळतील. मात्र, तेवढ्यात माझे शिक्षक ओरडले, ‘श्रद्धा!’ आणि शेवटी मी पकडले गेले. स्पष्टपणे मी एक भयानक खाेटारडी आहे.” तू झुठी में मक्कर ची निर्मिती लव फिल्म्स आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.(when bollywood actress shraddha kapoor was caught red handed while cheating then what happened see tu jhoothi main makkaar )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! हिंदी सिनेमातील ‘या’ जेष्ठ दिग्दर्शकांच्या दोन्ही किडन्या निकामी?

अभिनेत्री रिद्धिमा पंडितने घेतला मोठा निर्णय; 32 व्या वर्षी केले एग्स फ्रीज

हे देखील वाचा