भाची श्रद्धा कपूरसोबत काम करण्याच्या प्रश्नावर पद्मिनी कोल्हापुरेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, ‘ऑफर्स येतात, पण…’

प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. पद्मिनी यांनी ७०- ८० च्या दशकात रुपेरी पडद्यावर आपली छाप सोडली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर त्यांचा आणखी एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पद्मिनी कोल्हापुरे या त्यांची भाची आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत चित्रपट करणार आहे. याच संदर्भात त्यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी आपले मत मांडले आहे.

त्या म्हणाल्या की, “मला तिच्यासोबत काम करण्याच्या अनेक ऑफर्स येतात, पण मला काम करावं वाटेल, असं काहीच रोमांचक नाही.”

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या ७० आणि ८० च्या दशकातील एक यशस्वी अभिनेत्री होत्या. आता त्यांची भाची श्रद्धा कपूर हा त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत असल्याचे दिसत आहे. पद्मिनी यांनी शेवटच्या अर्जुन कपूर आणि क्रिती सेननसोबत ‘पानिपत’ या चित्रपटात रुपेरी पडद्यावर दिसल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. पद्मिनी या रूपेरी पडद्यावर बऱ्याच काळानंतर दिसल्या होत्या. (It’s not exciting to want to work Padmini Kolhapure replied to the offer)

View this post on Instagram

A post shared by padminikolhapure (@padminikolhapure)

याव्यतिरिक्त, एका मुलाखतीत पद्मिनी कोल्हापुरे यांनी पुढील प्रोजेक्टबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, “आजकाल इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले काम होत आहे, त्यामुळे मी त्यांचा एक भाग होण्यास तयार आहे. मी नुकतेच एका वेबसीरिजचे शूटिंग पूर्ण केले आहे.”

View this post on Instagram

A post shared by padminikolhapure (@padminikolhapure)

फक्त श्रद्धाच नाही, तर पद्मिनी यांचा मुलगा प्रियांक शर्मा आणि पुतण्या सिद्धांत कपूर देखील त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेत असताना दिसून येत आहेत. जेव्हा त्यांना विचारले की, त्यांना त्याच्या कुटुंबातील पुढच्या पिढीबरोबर काम करण्याची ऑफर मिळते का? तर त्या म्हणाल्या की, “प्रियांकसोबत नाही, पण मला श्रद्धासोबत काम करण्याची ऑफर येते, पण आतापर्यंत मला असे कधीच वाटले नाही की मी हे करावं.”

View this post on Instagram

A post shared by padminikolhapure (@padminikolhapure)

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात आपली स्थान निर्माण केले होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ‘प्रवास’ हा होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

Latest Post