Saturday, June 29, 2024

पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं, असं म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी शालेय शिक्षण घेत असतानापासून एखादी खास व्यक्ती असते. थोडे मोठे झाल्यांनतर म्हणजे १८ ते १९ वयापर्यंत सर्व मुलं मुली आपल्या नात्याला, आपल्या मैत्रीला प्रेमाचं नाव देतात. मग सुरु होते त्यांची प्रेमकहाणी. अगदी लग्न झालेली जोडपी पटत नसल्याने घटस्फोट घेतात. तेव्हा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे वेगळे होणे यात काही नवल नाही. तरुण आणि अल्लड वयामध्ये एकमेकांविषयी फक्त आकर्षण असते. १८ ते १९ वयापर्यंतच्या मुलांना प्रेमाची व्याख्या नीट समजलेलीच नसते. त्यामुळे त्यांचे मन नेहमी बेचैन आणि विचलित असते. एका मुलीला डेट करत असताना अनेकांना दुसऱ्या मुलीला देखील डेट करण्याचा मोह होतो. परंतु एक ना एक दिवस हे सर्व समोर येते आणि त्यांचे ब्रेकअप होते. बॉलिवूडमध्ये देखील मोठमोठ्या कलाकारांचे लहान वयात अनेक गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड झालेले आहेत. यातीलच एक सलमान खान.

बॉलिवूडमधील दबंग खानच्या प्रेमकहाण्या तर जग जाहीर आहेत. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात असलेल्या मुलींबद्दल माहिती आहे. अशात त्याला देखील वयाच्या १८ व्या वर्षी प्रेम झाले होते. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? हो नवीन आहे कारण एकाच वेळी त्याचा जीव दोन मुलींमध्ये अडकला होता. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एकदा त्याने या गोष्टीचा खुलासा केला होता. सलमान एकाच वेळी दोन मुलींना डेट करत होता. या शोमध्ये तो म्हणाला की, “माझ्या आयुष्यात एक मुलगी होती. पण तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहून मला कंटाळा आला होता. त्यामुळे मी आणखी एका मुलीला डेट करायचे ठरवले.” शोमध्ये सलमानचं हे वाक्य ऐकून सर्वजण चकित झाले. पुढे तो म्हणाला, “मी माझ्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटायला एका हॉटेलमध्ये गेलो, तेव्हा माझी पहिली गर्लफ्रेंड देखील तेथे उपस्थित होती. तिने मला ओळखले आणि मला म्हणाली तुझ्या दातांना काय झालं. मी घाबरलो. मला वाटलं होतं ती मला ओळखणार नाही, कारण मी माझे दात बदलून तेथे गेलो होतो. परंतु सर्व समोर आल्यावर मी दोघींनाही सर्वकाही खरं खरं सांगितलं.” (When dabang khan try to meet with his ex girlfriend with help of duplicate teeth read intresting anecdote)

कोणी दिले होते सलमानला नवीन दात
पुढे तो दातांविषयी सांगताना म्हणाला, “पहिल्या गर्लफ्रेंडला समजले, तर तिला वाईट वाटेल म्हणून मी एक युक्ती शोधली. माझे काका दातांचे डॉक्टर आहेत. मी त्यांच्याकडे जाऊन माझ्यासाठी नवीन दात बनवून घेतले होते. परंतु माझे पितळ उघडे पडले. कारण त्यावेळी माझे वय अवघे १८ ते १९ वर्षांमधील होते.” हे ऐकून शोमध्ये एकच हशा पिकाला. सर्वजण दबंग खानचा हा किस्सा ऐकून पोट दुखेपर्यंत हसू लागले. हे सांगताना तो देखील खूप हसत होता.

अभिनेत्याच्या प्रेमकहाण्या सर्वांनाच माहित आहेत. बॉलिवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्रींनबरोबर त्याचे नाव जोडले गेले आहे. यामध्ये संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ या अभिनेत्रींचा समावेश आहे. यांच्यासह त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या परंतु त्याने कधीच आपले संबंध लग्नापर्यंत नेले नाही. त्यामुळे अनेकवेळा तो वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला.

सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘टाइगर ३’ या चित्रपटामध्ये तो कॅटरिना कैफसह झळकणार आहे. तसेच सूत्रसंचालक म्हणून ‘बिग बॉस १५’मध्ये तो येणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा