Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड उत्तम अभिनेता कोण रणबीर की रणवीर? कोंडीत सापडलेल्या दीपिकाने दिले ‘हे’ उत्तर

उत्तम अभिनेता कोण रणबीर की रणवीर? कोंडीत सापडलेल्या दीपिकाने दिले ‘हे’ उत्तर

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडते. रणबीर कपूर हा अभिनेत्री दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. जेव्हा हे तिघे एका मुलाखतीचा भाग होते तेव्हा काय झाले असेल याची कल्पना करा. एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा दीपिकाला रणवीर आणि रणबीरपैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आले तेव्हा अभिनेत्री मोठ्या कोंडीत सापडली.

सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर दिसत आहेत. यावेळी दीपिकाला विचारण्यात आले की, तिच्या मते, रणवीर सिंग आणि रणबीर कपूरमध्ये कोणता अभिनेता चांगला आहे? तर या प्रश्नाला उत्तर देताना दीपिका म्हणाली, ‘हा प्रश्न जणू कोणीतरी मला आई आणि वडिलांपैकी एक निवडण्यास सांगितले आहे. दीपिकाच्या या उत्तरावर रणबीरने लगेच सांगितले की, तो वडिलांची भूमिका करण्याचा विचार करू शकतो. रणबीरच्या या उत्तरानंतर उपस्थित सर्वजण हसू लागले आणि वातावरण शांत झाले.

तिच्या या उत्तरामुळे दीपिकाला खूप ट्रोल करण्यात आले. रणबीर कपूर हा दीपिकाचा एक्स होता हे सर्वांना माहीत आहे. पण आता दोन्ही स्टार्स त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत आणि दोघांनी लग्न केले आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहेत. दोघांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीमध्ये लग्न केले. दोघेही लवकरच आई-वडील होणार आहेत. दीपिकाने स्वतः आई झाल्याचा आनंद तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह १४ एप्रिल २०२२ रोजी झाला. लग्नानंतर दोघांनी आपली मुलगी राहा हिचे स्वागत केले.

या चित्रपटांमध्ये दीपिका दिसणार आहे
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका लवकरच ‘सिंघम अगेन’ आणि ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. रणवीर सिंग ‘सिंघम अगेन’ आणि ‘डॉन 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दोन्ही स्टार्सना आपल्या मुलाच्या जन्मापूर्वी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करायचे आहे. त्याचवेळी, रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
कुटुंबासोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचली मृणाल ठाकूर, ‘फॅमिली स्टार’साठी घेतले आशीर्वाद

हे देखील वाचा