Thursday, December 5, 2024
Home बॉलीवूड जेव्हा डॉक्टरांनीही सोडल्या होत्या आशा, दिग्दर्शकाला म्हणालेले, ‘तुमच्याकडे आता फक्त २ आठवडे शिल्लक’

जेव्हा डॉक्टरांनीही सोडल्या होत्या आशा, दिग्दर्शकाला म्हणालेले, ‘तुमच्याकडे आता फक्त २ आठवडे शिल्लक’

बॉलिवूडला एकापेक्षा एक हटके सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे अनुराग बासू होय. बासू यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाला तोंड देत त्यावर मात केली आहे. ते संकट दुसरे-तिसरे कोणते नसून रक्ताच्या कँसरचे होते. महत्त्वाचं म्हणजे, डॉक्टरांनीही आशा सोडल्या होत्या की, बासू हे फार दिवस जगणार नाही. त्यांनी बासू यांना असेही सांगितले होते की, त्यांच्याकडे आता फक्त २ आठवड्यांचा कालावधी बाकी राहिला आहे. असे असले, तरीही बासू यांनी कँसरविरुद्ध आपली झुंज कायम ठेवत शेवटपर्यंत लढा दिला आणि त्यावर मात करतच सुटकेचा निश्वास सोडला.

माध्यमांतील वृत्तानुसार, अनुराग बासू (Anurag Basu) हे २००४मध्ये रक्ताच्या कँसरने (Blood Cancer) ग्रस्त होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “डॉक्टरांनी मला सांगितले होते की, त्यांच्याकडे आयुष्य जगण्यासाठी फक्त २ आठवडे बाकी आहेत. तो आयुष्यातील खूपच भयंकर काळ होता. कारण, तेव्हा त्यांना समजले होते की, ते कँसरग्रस्त आहेत आणि त्यांची पत्नी गर्भवती होती.”

सुनील दत्त यांच्या मदतीने लवकर मिळाला उपचार
अनुराग बासू यांनी आपली पत्नी तानीला सांगितले नव्हते की, ते रक्ताच्या कँसरने ग्रस्त आहेत. मात्र, त्यांनी माध्यमांमार्फत याबाबत समजले. दिग्दर्शक बासू यांना उपचारासाठी जेव्हा मुंबईच्या रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. ते दिग्गज अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्या मदतीने रुग्णालयात लवकर दाखल होऊ शकले आणि त्यांना योग्य उपचार मिळाला.

अनुराग बासू यांनी कीमोथेरेपीदरम्यानही केले काम

सिनेसृष्टीशी जोडलेल्या त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांच्यासाठी रक्तदानही केले होते. त्यांना माहिती नव्हते की, त्यांच्या नसांमध्ये कोणाचे रक्त होते. त्यांना कीमोथेरेपीतून जावे लागले होते. त्यांना उपचारासाठी पैसे हवे होते, त्यामुळे त्यांना घरी परतावे लागले होते. अनुराग यांची जेव्हा कीमोथेरेपी सुरू होती, तेव्हा ते मास्क परिधान करून ‘गँगस्टर’ सिनेमाची शूटिंग करत होते.

अनुराग बासू यांनी आजारपणातही लिहिली होती ‘लाईफ इन अ मेट्रो’ची स्क्रिप्ट
त्यावेळी संकटांचा सामना करणाऱ्या अनुराग बासू यांनी स्वत:ला खचू दिले नाही. त्यांनी यादरम्यान ‘गँगस्टर’ आणि ‘लाईफ इन अ मेट्रो’ यांसारख्या सिनेमांची स्क्रिप्ट लिहिली होती. प्रेक्षकांना आजही त्यांचे हे सिनेमे फार आवडतात. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

अनुराग बासू यांचे सिनेमे
अनुराग बासू यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमध्ये ‘मर्डर’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘गँगस्टर’, ‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘काईट्स’, ‘बर्फी‘, ‘जग्गा जासूस’, ‘लुडो’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा