Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘किसिंग सीन केल्यामुळे रक्त वाहूस्तर मारलं…’, इमरान हाश्मीने शेअर केला पत्नी सोबतचा धक्कादायक किस्सा

‘किसिंग सीन केल्यामुळे रक्त वाहूस्तर मारलं…’, इमरान हाश्मीने शेअर केला पत्नी सोबतचा धक्कादायक किस्सा

प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी याला बॉलिवूडमध्ये बोल्ड सीनमुळे ओळखले जाते. त्याने इंडस्ट्रीमध्ये ‘मर्डर‘ आणि ‘गॅंगस्टर‘ सारख्या गाजणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाया त्याला ‘सिरियल किसर’ नावानेही ओलखले जाते. इमरानला त्याच्या बोल्ड सिनमुळे सतत ट्रोलिंगचाही सामना कारावा लागतो. एका मुलाखतीदरम्यान इमरानला त्याच्या बोल्ड सिनवर पत्नीची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा अभिनेत्याने एक धक्कदायक किस्सा सांगितला होता. 

बॉलिवूडमधील ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखला जानारा लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी (Imran Hashmi) याने ‘कॉफी विद करण’ (Coffee) With Karan) मध्ये एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारला होता की, बोल्ड सीन पाहिल्यावर तुझी पत्नी म्हणजेच परवीन साहानी (Pravin Sahani) कशी प्रतिक्रिया देते तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, “किसिंग सीन केल्यामुळे त्याची बायको त्याला मारते. त्याशिवाय ती अजूनही मारते. मात्र, आता तुलनेने कमी मारते. पूर्वी ती बॅगने मारायची आता हाताने मारते, बऱ्याच वर्षांमध्ये यात बदल झाला आहे”, असं इमरानने 2016 साली करण विद कॉफी या कार्यक्रमामध्ये सांगितले होते.

इमरानने ‘द किस ऑफ लाइफ’ या पुस्तकाच्या प्रद्रशनावेळी अभिनेत्याने त्याच्या पत्नीविषयी खुलासा केला होता. परवीन चिडल्यानंतर तो तील कसा शांत करतो हे सांगत असताना म्हणाला की, “तिचा राग शांत करण्यासाठी मी तिला हॅंड बॅग गिफ्ट करतो. प्रत्येक चित्रपटाच्या सीनवेळी मी तीला हॅंड बॅग गिफ्ट करत असतो. त्याशिवाय तिच्याकडे बॅगनी भरलेलं कपाट आहे, पण तरीही तिला बॅगच हवी असते. अशी आमच्या दोघांची डील झाली आहे.”

 

View this post on Instagram

 

इमरानने 2010 साली सांगितले होते की, परवीनने माझा ‘क्रुक’ चित्रपट पाहिल्यानंतर तिने मला मारलं होतं. माझ्या चित्रपटाच्या पहिल्या स्क्रिनिंगमधून बाहेर पडल्यानंतर माझी पत्नी नेहमीच मला मारते. पण तिला माहितिये की, हे माझं काम आहे. त्यामुळे ते सीन करावेच लागतात.

पहिल्या सीटवर माझी बायको मला नखं मारत होती. ‘तू काय केलं आहेस, तू मला हे सांगितलं नाहीस, तू जे काही करतोय ते बॉलिवूड नाही,’ असं ती म्हणाली होती. तिच्या नखांमुळे मला जखम झाली होती आणि रक्त वाहू लागलं होतं, असं अभिनेत्याने 2014 मध्ये करण विद कॉफी कार्यक्रमामध्ये आला होता तेव्हा तो धक्कादायक किस्सा सांगितला होता.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘साक्षात प्रभू आल्याचा भास’, अरुण गोविल यांना भेटून भावुक झाले स्वामी जगद्गुरु रामभद्राचार्य
‘मी काही वाईट काम करतेय का?’, आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थनाचा प्रतिसवाल

हे देखील वाचा