Thursday, March 28, 2024

…म्हणून चित्रपट निर्मात्यांच्या बायका उडवायच्या हेमा मालिनींच्या साडीची खिल्ली; म्हणायच्या, ‘ती पाहा…’

बॉलिवूडमध्ये ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी नेहमीच चाहत्यांच्या आवडत्या राहिल्या आहे. त्यांची गणना बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक दशके गाजवली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या साड्यांमुळेही चर्चेत असायच्या. मात्र, एक वेळ अशी आली होती की, त्यांना या साड्यांमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते.

ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखल्या जातात हेमा मालिनी
हेमा मालिनी अनेकदा जड कांजीवरम साड्यांमध्ये दिसतात. त्या त्यांच्या ड्रेसिंग सेन्स आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. २०१५ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांची आई जया चक्रवर्ती त्यांना पारंपारिक साडी घालत असायच्या. त्यांनी या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न देखील केला, पण सर्व व्यर्थ गेले. (When Film Producers Wives Would Make Fun of Actress Hema Malini Saree)

साड्या पाहून उडवली जायची खिल्ली
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सांगितले होते की, चित्रपट निर्मात्यांच्या पत्नी  त्यांच्या कांजीवरम साड्या पाहून त्यांच्यावर हसायच्या. त्या त्यांच्या साड्यांची आणि मोठ्या ब्लाऊजची खिल्ली उडवत असायचे. त्या म्हणायच्या की बघा, ‘मद्रासन आली आहे.’

संगोपनात आईची मोठी भूमिका
हेमा यांच्या मते, ‘त्यांच्या संगोपनात आईचा मोठा हात होता. त्यांना आज हे यश मिळाले आहे, ते आईमुळेच आहे. त्यांच्या आईनेच त्यांना शास्त्रीय नृत्य शिकण्याची प्रेरणा दिली.’ हेमा म्हणाल्या की, ‘जर त्या शास्त्रीय नृत्यांगना नसत्या, तर हे सर्व साध्य झाले नसते.’

आईची उपस्थिती हेच मार्गदर्शन
अभिनेत्री हेमा मालिनी त्यांच्या आईच्या १७ व्या पुण्यतिथीला म्हणाल्या होत्या की, “माझ्यासाठी सर्व काही माझी आई आहे. आईने मला घडवले. मला वाटते की, आजही तिची उपस्थिती मला मार्गदर्शन करते.”

राज कपूरने बोलली एक मोठी गोष्ट
जेव्हा हेमा मालिनी १४ वर्षांच्या होत्या, तेव्हापासूनच चित्रपट निर्माते त्यांना चित्रपटाची ऑफर देत होते. राज कपूर एकदा हेमा मालिनी यांना म्हणाले होते की, हेमा रुपेरी पडद्यावरील मोठी स्टार बनणार आहे.

हेमाच्या आईला आवडत नव्हते धर्मेंद्र
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर हेमा यांच्या आईला धर्मेंद्र आवडत नव्हते. मात्र, त्यांना माहिती होते की, धर्मेंद्र यांना त्यांच्या मुलीशी लग्न करायचे आहे. हेमा मालिनी यांच्या आईची इच्छा होती, की त्यांचा जावई दक्षिण भारतीय असावा.

हेमा ‘सिमला मिर्ची’ चित्रपटात दिसल्या
हेमा मालिनी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हेमा मालिनी २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिमला मिर्ची’ चित्रपटात पडद्यावर दिसल्या होत्या. त्यांचा हा शेवटचा चित्रपट होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक

हे देखील वाचा