बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खान ही लोकप्रिय जोडी आहे. शाहरुख खान आणि गौरीने १९९१ साली लग्न केले. त्यांची बॉंडींग देखील कमालीची आहे. त्यांच्यातील प्रेम आपण सोशल मीडियावर नेहमीच पाहत असतो. अनेक मुलाखतीत देखील त्यांनी त्यांच्या प्रेमाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु या लव्ह बर्डसच्या आयुष्यात अशी एक वेळ आली होती. जेव्हा हे दोघे एकमेकांपासून लांब गेले होते. माध्यमातील वृत्तानुसार त्यांच्या रिलेशनच्या सुरुवातीला असे काही झाले होते ज्यामुळे ते दोघे वेगळे झाले होते.
गौरी खानच्या सांगण्यानुसार ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा शाहरुख खान तरुण होता. गौरी सांगते की, तिने शाहरुख खानसोबत त्यांच्या रिलेशनमधून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. याचे कारण सांगताना गौरी म्हणते की, शाहरुख खान तिच्याबाबत खूप पसेसिव्ह होते. याच गोष्टीमुळे ती वैतागली होती.
तिला जरा त्यांच्या नात्यामधून ब्रेक हवा होता. याच कारणामुळे रिलेशनच्या सुरुवातीच्या काही दिवसात ती किंग खानपासून दूर गेली होती. काही काळानंतर ते पुन्हा एकदा एकत्र आहे त्यानंतर त्यांच्यात नात्यात सुधारणा झाली आणि ते पुन्हा एकत्र आले.
शाहरुख खानच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे, त्याने 2018 मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात काम केले आहे. तो त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
शाहरुख खानची पत्नी होणे गौरी खानसाठी अडचणीचे ठरले, म्हणाली, ‘लोकांनी मला काम…’
जेव्हा वडील महेश भट्ट यांचे सोनी राजदानशी असलेले नाते समजले होते पूजा भट्टला; अभिनेत्रीने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया