Friday, July 12, 2024

जेव्हा वडील महेश भट्ट यांचे सोनी राजदानशी असलेले नाते समजले होते पूजा भट्टला; अभिनेत्रीने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक महेश भट्ट हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच लाईमलाईटमध्ये राहिले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही. महेश भट्ट यांनी त्यांची पहिली लव्ह लाइफ आणि नंतर लग्नावर एक चित्रपटही बनवला होता, ज्याला ‘आशिकी’ असे नाव देण्यात आले होते. अगदी लहान वयात महेश भट्ट लॉरेन ब्राइट म्हणजेच किरण भट्ट यांच्या प्रेमात पडले होते. वयाच्या 20व्या वर्षी लॉरेनशी लग्न केल्यानंतर, जवळपास 11-12 वर्षानंतर त्यांच्या नात्यात पेच निर्माण झाला. दोघांची प्रेमकथा खूप रोमँटिक पद्धतीने सुरू झाली, पण शेवट खूप वाईट झाला.

महेश भट्ट यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, “शालेय काळात मी किरण म्हणजेच लॉरेन ब्राइटच्या प्रेमात पडलो, जी बॉम्बे स्कॉटिश अनाथाश्रमात शिकत होती.” ते भिंतीवर उडी मारून लॉरेनला भेटायला जात असे. परंतु एके दिवशी त्यांना असे करताना पकडले गेले, त्यानंतर लॉरेन ब्राइटला अनाथाश्रमातून काढून टाकण्यात आले होते.

महेश भट्ट 20 वर्षांचे असताना, त्यांनी लॉरेन ब्राइटशी लग्न केले. लग्नाच्या एक वर्षानंतर, म्हणजेच 21व्या वयात ते वडील झाले. लॉरेनने पूजा भट्ट नावाच्या एका गोंडस मुलीला जन्म दिला. काही काळानंतर त्यांच्या पत्नीने मुलालाही जन्म दिला. पण कुटुंबात प्रेम राहिले नाही आणि आपसात कलह सुरू झाला.

ते सतत त्यांच्या कारकीर्दीत फ्लॉप होऊ लागले. त्यांचे सर्व चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत होते. यासोबतच विवाहित असूनही परवीन बाबीसोबत त्यांच्या नात्याच्या अफवा जोर धरू लागल्या. त्यांनी किरणला परवीन बाबीसाठी सोडले. परंतु त्यानंतर सोनी राजदान त्यांच्या आयुष्यात आल्या. सोनी राजदान बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. यादरम्यान दोघांचे प्रेमसंबंध वाढले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

महेश यांना सोनीशी लग्न करायचे होते, पण त्यांना किरणला घटस्फोटही द्यायचा नव्हता. यामुळे, ख्रिश्चन धर्म स्वीकारत यांनी सोनी रझदानशी लग्न केले.

जेव्हा वडील महेश भट्ट यांचे सोनी राजदानशी असलेल्या प्रेमसंबंधांची माहिती 10 वर्षाच्या पूजाला मिळाली, तेव्हा तिला फार राग आला होता. एका मुलाखतीदरम्यान पूजाने सांगितले की, तिला वडील महेश भट्टचा खूप राग आला होता. महेश यांनी तिच्या आईला दुसर्‍या बाईसाठी सोडले, यामुळे पूजाला खूप वाईट वाटले होते.

महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट अशा दोन मुली आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
आलियासाठी तिची आई असणाऱ्या सोनी राजदान यांनी केला त्यांच्या ‘या’ स्वप्नाचा त्याग
शहनाज गिलची मोहक अदा, पाहा फोटो

हे देखील वाचा