Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड जेव्हा गोविंदाने सर्वांसमोर मारली होती कृष्णा अभिषेकच्या कानाखाली; मुलगीही झाली होती आश्चर्यचकित!

जेव्हा गोविंदाने सर्वांसमोर मारली होती कृष्णा अभिषेकच्या कानाखाली; मुलगीही झाली होती आश्चर्यचकित!

गोविंदा हा आपली पत्नी सुनिता हिच्यासोबत अनेक रियॅलिटी शोमध्ये जात असतो. एकदा ते दोघे कृष्णा अभिषेकच्या शोमध्ये गेले होते. तिकडे त्या दोघांनी कृष्णासोबत खूप मस्ती केली होती. या शोचा एपिसोड प्रदर्शित होताच खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यात कृष्णा ह्यांनी गोविंदा आणि सुनिताला त्यांच्या शो मध्ये बोलवले आहे. ज्यात ते खूपच खुश दिसत होते. परंतु यादरम्यान गोविंदाने कृष्णाला कानाखाली मारली होती.

पडद्यामागची गोष्ट सांगायची झाल्यास, वैयक्तिक आयुष्यात कृष्णा आणि गोविंदा हे मामा- भाचे आहेत. आता काही वर्षांपासून यांच्या नात्यात तणाव आणि दुरावा निर्माण झालाय. परंतु एके काळी त्या दोघांची खूपच चांगली मैत्री होती. गोविंदा हे आपली पत्नी सुनिता हिच्यासोबत एकदा कृष्णाचा शो ‘द ड्रामा कंपनी’ मध्ये गेले होते. तिथे त्यांनी या शोमध्ये कृष्णासोबत खूपच मस्ती केली होती. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यात कृष्णा असे म्हणतो की, “मी अनेक वेळा गोविंदाची मिमिक्री केली आहे. पण आज त्यांच्या समोर मला त्यांची मिमिक्री करायला जमत नाहीये.”

त्यानंतर गोविंदा कृष्णाचे आभार मानतो आणि बोलता बोलता त्याच्या 2 कानाखाली मारतो. हे पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची मुलगी देखील आश्चर्यचकित हैराण होते. पण त्यानंतर गोविंदा सविस्तरपणे सांगतो की, “लहानपणी कृष्णाच्या आईला असे वाटायचे की मी त्यांच्या मुलांना खूप मारतो, पण असे काहीही नसायचे. मी कधीच कोणाला मारलं नाही, तेव्हा कृष्णा गालावर हात ठेवून थांबायचा. त्यामुळे त्याला काही लागत नसायचं.” त्यानंतर गोविंदा असे सांगतो की, तो कृष्णाच्या आईला आपल्या आईसमान मानतो. कारण लहान असताना ते गोविंदाची खूप काळजी घेत असे. कारण त्याची आई कामाला जायची. त्यामुळे गोविंदाची सगळी काळजी कृष्णाची आई पद्मा हीच घेत असे.

त्यानंतर गोविंदाने खुलासा केला की, पद्माला लग्नानंतर 7-8 वर्ष अपत्य झाले नव्हते, तेव्हा गोविंदा यांनी देवाकडे नवस मागितला की जर पद्मा यांना अपत्य झालं, तर ते त्याला वैष्णोदेवीला घेऊन येतील. जेव्हा कृष्णाचा जन्म झाला, तेव्हा तो कृष्णाला वैष्णोदेवीला घेऊन गेला.

व्हिडीओ पाहा या लिंकवर क्लिक करुन- https://www.youtube.com/watch?v=4vPIZDoYaXE

ही गोष्ट अनेक चाहत्यांना माहिती नसेल की, कृष्णाची पत्नी ‘कश्मिरा शाह’ हिने एका ट्विटमध्ये अप्रत्यक्षपणे गोविंदाला लग्नात नाचणारा माणूस असे संबोधले होते. त्यामुळे त्या दोन्ही परिवारांमध्ये तिढा निर्माण झाला. त्यामुळे कृष्णा आणि गोविंदा यांच्या परिवारातील नाती बिघडली आणि ते अजूनही एकमेकांसोबत बोलत नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-

क‌ॅमेरासमोर ‘हीट’ आणि ‘फिट’ असणाऱ्या ‘या’ जोड्या पडद्यामागे एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत; कारणेही तशीच खास

आजही सलमान-शाहरुखसारखा दबदबा राहिला असता, पण गोविंदाला नडल्या करियरमधल्या ‘त्या’ चुका

‘या’ कारणासाठी गोविंदाने केले होते पत्नी सुनीताशी दुसऱ्यांदा लग्न!

हे देखील वाचा