Friday, March 31, 2023

जेव्हा ‘गुम है किसी के प्यार में’ मधील सई आणि भवानी काकूने एकमेकींसोबत बदलल्या व्यक्तीरेखा; पुढे जे झाले…

मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी त्यांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटातील त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांसमोर सादर केल्या. मोठा पडदा गाजवल्यानंतर किशोरी ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमध्ये दिसल्या होत्या. यानंतर त्या आता छोट्या पडद्यावरील ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. याशिवाय किशोरी सोशल मीडियावर सक्रिय राहून, त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.

किशोरी यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेतील अभिनेत्री आयेशासोबत दिसल्या आहेत. कमालीची बाब म्हणजे, या दोघी यात एकमेकींच्या भूमिका साकारताना दिसल्या आहेत. म्हणजेच आयेशा यात भवानी काकू बनली, तर किशोरी सई बनल्या आहेत. यात दोघींचा मजेदार संवाद चालू आहे, जो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

या दोघींची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर जबरदस्त आहेच, मात्र त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील चाहत्यांना पसंत पडली आहे. या व्हिडिओवर आता त्यांच्या चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला २६ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे.

किशोरी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी बऱ्याच हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या समवेत भूमिका असलेल्या ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. तसेच ‘शिर्डी साईबाबा’ याद्वारे त्यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केले होते. याशिवाय किशोरी चित्रपट निर्मात्या देखील आहेत. २०१९ साली कलर्स मराठी चॅनलवरील ‘बिग बॉस’ मराठी रियालिटी शोमधील सहभागामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ढोल कुणाचा वाजं जी…!’ गाण्याचा तालावर झोका घेताना दिसली अनुष्का सरकटे; ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओला चाहत्यांची पसंती

-‘पुन्हा अभिनेत्रीसोबच डान्स केला तर धुलाई करेन…’ अंशुमन विचारेच्या लाडकीने दिली त्याला धमकी

-‘जलपरी’ बनून सारा अली खानने मारली होती समुद्रात उडी; व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा पाहाच

हे देखील वाचा