Friday, August 8, 2025
Home कॅलेंडर अय्यो! कपिल शर्मा गेला होता स्वतःच्याच लग्नातून पळून? वाचा काय झाला होता नक्की किस्सा

अय्यो! कपिल शर्मा गेला होता स्वतःच्याच लग्नातून पळून? वाचा काय झाला होता नक्की किस्सा

टेलीव्हिजनचा सर्वाधिक चर्चेत असणारा आणि सर्वांना आवडलेला कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ दर आठवड्याला लोकांना भरभरून हसवतो. या शोमध्ये दर आठवड्याला नवनवीन पाहुणे येत असतात ज्यांना कपिल आणि त्याची संपूर्ण टीम खूप हसवते. या दरम्यान कपिल या सेलिब्रिटींबरोबर बर्‍याच गोष्टीही शेअर करतो. या वेळी अभिनेता आणि राजकारणी राज बब्बर आणि अभिनेत्री जया प्रदा या शोमध्ये पाहुणे म्हणून दाखल झाले.

राज बब्बर आणि जया प्रदा यांनी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये खूप गप्पा मारल्या. यादरम्यान गप्पा मारता मारता कपिल शर्माने आपल्या लग्नाच्या दिवसाविषयीचं रहस्यही या दोन पाहुण्यांसमोर उलगडलं. कपिलने राज बब्बर आणि जया प्रदा यांच्याशी एक किस्सा शेअर केला ज्यामध्ये त्याने स्वतःच्या लग्नातून पळ काढला होता.

शोवर कपिलने अभिनेता-राजकारणी राज बब्बर यांना विचारले की, ‘तुम्ही जेव्हा कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहता तेव्हा तुम्ही वैयक्तिकरित्या स्टेजचा आढावा घेता का?’ या प्रश्नाला उत्तर देताना राज बब्बर म्हणाले की, ‘जेव्हा मी राजकारणात सामील झालो होतो तेव्हा पुष्कळ लोक आमच्या सभेत येत असत. आम्हाला त्यांना ढकलण्याची इच्छा नव्हती. पण एके दिवशी असे काही लोक होते ज्यांनी स्टेजवर उडी मारली. स्टेज एकाच वेळी बर्‍याच लोकांचे वजन पेलू शकला नाही आणि तो कोसळला. या भीतीपोटीच तेव्हपासून मी वैयक्तिकरित्या स्टेज मजबूत आहे की नाही याची खात्री करून घेत असतो.’

राज बब्बर यांचा हा किस्सा ऐकताच कपिल शर्मानेदेखील आपल्या लग्नाशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला. कपिलने सांगितलं की, ‘असा किस्सा माझ्या बाबतही घडला आहे. माझ्या स्वतःच्या लग्नातही हे घडलं आहे. बऱ्याच लोकांनी स्टेजला वेढा घातला होता. इतक्या लोकांना पाहून मी पळत माझ्या खोलीत गेलो आणि पुन्हा बाहेर पडलोच नाही.’ ही गोष्ट कपिलने शेअर करताच तिथे उपस्थित सर्व लोक जोरजोरात हसू हसू लागले.

कपिल शर्मा आपल्या शो दरम्यान अनेकदा आपल्या पत्नी गिन्नी चतरथचा उल्लेख करत राहिला आहे. कपिल नेहमीच शोमध्ये स्वत:च्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से शेअर करतो. कपिलने साल २०१९ मध्ये गिन्नी चतरथसोबत लग्न केलं होते. त्यांना दोघांनाही अनायरा ही मुलगी आहे.

हे देखील वाचा