टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा आणि आवडता शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’. या शोमध्ये ज्याप्रकारे स्टंट केले जात आहेत. ते पाहून प्रेक्षक पुरते हैराण झाले आहेत. शोच्या मागील दोन आठवड्यात खूप काही पाहायला मिळाले आहे. स्पर्धक मेडलसाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. आता तिसऱ्या आठवड्यात त्यांच्या स्पर्धेची पातळी आणखीनच कठीण झाली आहे. निक्की तांबोळी आणि वरुण सूदला देखील या कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
या शोचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये निक्की तांबोळी आणि वरुण सूद बर्फाच्या पाण्यात ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ते दोघेही एका मोठ्या टॅंकच्या आतमध्ये दिसत आहेत. ज्यामध्ये खूप बर्फ आहे. (When nikki tamboli dance with varun sood in icy water on khatron ke Khiladi stage)
निक्की तांबोळीला या शोच्या पहिल्या आठवड्यातच बाहेरचा रस्ता दाखवला होता. परंतु तिला दुसरी संधी दिली गेली. आता ती शोच्या तिसऱ्या आठवड्यात दिसणार आहे. निक्कीला आता या संधीचा फायदा घ्यायचा आहे. यासाठी ती खूप प्रयत्न करत आहेत. मागच्या आठवड्यात तिचे खूप कौतुक झाले. या टास्कमध्ये तिने केवळ स्वतःला वाचवले नाही तर अभिनव शुक्लाला देखील वाचवले होते.
मागील काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळी याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यावेळी ती खूप दुःखात होती. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी ती ‘खतरों के खिलाडी’च्या शूटिंगसाठी केपटाऊनला गेली होती. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-