Sunday, June 23, 2024

‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) ही अशी एक अभिनेत्री आहे जिने हॉलिवूडमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. आज तिचे देश-विदेशात मोठे नाव बनले आहे. प्रियांका आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये क्वचितच दिसते. पण तिचे चित्रपट कोणीही विसरू शकत नाही. प्रियांकाने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून, तिने आपल्या कामाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्रकाश राज दिग्दर्शित ‘जय गंगाजल’ या चित्रपटातही प्रियांका होती.

शूटिंग संपल्यानंतर प्रियांका चोप्रा लागली रडू
या चित्रपटात प्रियांकाने एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. शूटिंगदरम्यान प्रियांकाने असे काही केले होते की, ती ढसाढसा रडू लागली आणि नंतर तिला गप्प करावे लागले. खरं तर, एका जुन्या मुलाखतीत प्रियांकाचा को-स्टार आणि अभिनेता मानव कौलने सांगितले होते की, प्रियांकाने त्याला चुकून मारले होते, त्यानंतर ती रडू लागली होती.

मानव कौलने मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही ऍक्शन सीन करत होतो. तिला उठून मला मारायचा होते. म्हणून ती उठली पण चुकून तिने माझ्या गळ्यावर हात मारला, ही काही मोठी गोष्ट नव्हती. जेव्हा तुम्ही काही ऍक्शन सीन करता तेव्हा काहीतरी चूक होते. काहीतरी चूक होऊ शकते आणि दुखापत होऊ शकते. या घटनेनंतर प्रियांका माझ्याकडे आली आणि मला विचारले की, तुला दुखापत झाली आहे का? त्यानंतर मी तिला नाही सांगितले आणि मग ती रडू लागली. ती इतकी रडू लागली की, तासाभराने मला सर्व काम सोडून तिला गप्प करावे लागले. ती पुन्हा पुन्हा सांगत होती की, मला माहित आहे की, मी तुला दुखावले आहे.”

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये प्रियांका रडताना दिसत आहे आणि मानव तिला गप्प करत आहे. यासोबतच प्रियांकाने कान पकडून मानवची माफीही मागितली. प्रियांकाने निक जोनाससोबत लग्न करण्याच्या दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचे शूटिंग केले होते.

प्रियांका अलीकडेच निक जोनाससोबत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती. तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून जोनास हे नाव काढून टाकले होते, त्यानंतर अशी अफवा पसरली की, प्रियांका निकपासून घटस्फोट घेत आहे. मात्र, काही काळानंतर तिने हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच प्रियांका आणि निक एकमेकांसोबत बराच वेळ घालवताना आणि प्रेम व्यक्त करताना दिसत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा