गेल्या वर्षी 6 फेब्रुवारीला लता मंगेशकर यांनी जगाचा निराेप घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक चमचमता तारा गमावला. वयाच्या 92व्या वर्षी गानकोकिळा लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने म्यूझिक इंडस्ट्री पोरकी झाली, असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरणार नाही. मात्र, मंडळी त्यांचा आणि राज कपूर यांचा एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. जो त्याकाळी ही बराच चर्चेत होता.
लता मंगेशकर म्हणजे संगीत जगतातील व्यक्तींसाठी दैवत आहे. भारतीय संगीतसृष्टीला शिखरावर पोहोचवण्यात लता मंगेशकर यांचा मोठा वाटा आहे, तर दुसरीकडे राज कपूर हे अभिनयात काम करणाऱ्या लोकांसाठी विद्यापीठच जणू. राज कपूर यांनी हिंदी सिनेमा सातासमुद्रापार पोहोचवला. दोघेही त्यांच्या क्षेत्रात अतिमहान म्हणूनच ओळखले जातात. मात्र, याच दोघांमध्ये एकदा राज कपूर यांच्याकडून लता मंगेशकर यांना एक शब्द बोलला गेला होता, ज्यामुळे लताजी दुखावल्या गेल्या होत्या. मात्र, राज कपूर यांनी वेळीच त्यांची समजूत काढली आणि वाद मिटला. (when raj kapoor indirectly called lata mangeshkar an ugly girl)
राज कपूर यांच्या कन्या असलेल्या ऋतू नंदा यांनी 2002 साली त्यांच्या पुस्तकात या घटनेबद्दल सांगितले आहे. 1978 साली आलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमात राज कपूर लता मंगेशकर यांना घेऊ इच्छित होते. त्यांनी राज कपूर यांच्या बाजूने लिहिले आहे की, ‘मी एक अशा माणसाची गोष्ट करण्याचे ठरवले आहे. जो एका स्त्रीवर प्रेम करतो आणि तिचा आवाज स्वर्गीय सुंदर असतो. मात्र, तिचे रूप सुंदर नसते.’ त्यांचा विश्वास होता की, प्रेम आणि विश्वास हे नात्यातील शुद्धतेवर अवलंबून आहे ना की सुंदरतेवर. या सिनेमासाठी लता मंगेशकर यांनी हो देखील म्हटले होते.
या घटनेबद्दल पत्रकार वीर संघवी यांनी देखील त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. राज कपूर लता मंगेशकर यांना म्हणाले होते की, ‘हातात एक दगड घेतला, तर तो सामान्य दगड असतो. मात्र, जर त्याला धार्मिक रंग लावला, तर तो दगडच देव बनतो. अशाच पद्धतीने आपण त्या गोष्टींना बघतो ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. तुम्ही एक सुंदर आवाज ऐकला. मात्र, नंतर तुम्हाला समजेल की, हा आवाज एका कुरूप महिलेचा आहे.’ एवढे बोलू राज कपूर थांबले आणि म्हणाले, ‘कुरूप गोष्ट काढून टाका. यावर लताजी नाराज होतील.’
यावर संघवी यांनी लिहिले होते की, ‘मला माहित होते की, ते कशाबद्दल बोलत आहेत. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमाची प्रेरणा त्यांना लता यांना पाहूनच आली होती. त्यांचा आवाज आणि रूप यामध्ये असलेल्या तफावतीमुळेच त्यांनी सिनेमा करायचे ठरवले. सिनेमाच्या सुरुवातीच्या प्रचार आणि प्रसारामध्ये लता मंगेशकर हेच नाव होते. या गोष्टीमुळे लताजी नाराज झाल्या आणि त्यांनी चित्रपटात गाणे गायला देखील नकार दिला.’
मात्र, राज कपूर यांनी लताजी यांची समजूत घातली, माफी मागितली आणि लताजी तयार झाल्या. पुढे झीनत अमान आणि शशी कपूर यांनी या चित्रपटात काम केले.(when raj kapoor indirectly called lata mangeshkar an ugly girl 2)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय असतो ग्रॅमी अवॉर्ड? नामांकन प्राप्त झालेल्या यादीत एर आर रहमान आणि गुलजार यांचेही नाव
…म्हणून लता मंगेशकर अविवाहित असूनही लावत होत्या कुंकू, गानकोकीळेच्या आयुष्यातील ‘त्या’ घटनेचा झाला खुलासा