Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘या गोष्टी खूप विचित्र आहेत’, विवेक ओबेरॉयबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सलमानने दिले होते उत्तर

‘या गोष्टी खूप विचित्र आहेत’, विवेक ओबेरॉयबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सलमानने दिले होते उत्तर

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामधला वाद हा कोणाला माहित नाही ही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. या दोघांमध्ये मोठ्या स्वरूपाचे भांडण झाले होते. ऐश्वर्या रायमुळे झालेल्या या भांडणांमध्ये विवेकने सलमानवर अनेक गंभीर आरोप केले होते. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या विवेकसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ही बाब सलमानला आवडली नाही आणि त्याने विवेकला एका रात्री फोन करत खूप झापले होते. यातच एका मुलाखतीदरम्यान सलमानला त्याच्या आणि विवेकच्या भांडणांबद्दल विचारले असता त्याने काही गोष्टी अगदी स्पष्ट सांगितल्या.

Photo Courtesy: Instagram/ vivekoberoi & aishwaryaraibachchan_arb & beingsalmankhan

मुलाखतीदरम्यान सलमानला विचारले गेले की, त्याने अभिषेक बच्चनला, शाहरुख खानला मिठी मारली, मात्र विवेक ओबेरॉयला कधी मिठी नाही मारली. यावर सलमान खान म्हणाला, “प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते. मला वाटते की राग आणि इतर गोष्टींसाठी देखील अशी एक एक्सपायरी डेट असावी. मी हे नाही सांगत की, मी जाऊन त्याला (विवेक ओबेरॉय) मिठी मारेल, भेटेन, बोलले. त्याला इच्छा असेल असे करायची तरी मी बाजूला होईल. मात्र मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही.”

पुढे सलमान म्हणाला, “त्याने माझ्या अनेक मित्रांसोबत त्यांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र मी त्यांना कधीच नाही सांगितले की, त्याला नका घेऊ. मला हा कधीच प्रॉब्लेम नाही आणि नसेल. गोष्ट फक्त एकच आहे की, जर मी कोणाशी हात मिळ्वण्याबाबत किंवा बोलण्याबाबत स्वतःला कम्फरटेबलें ठेऊ शकत नसेल तर मी पुढे जातो.” पुढे त्याला विचारले की, विवेकने एका कार्यक्रमदरम्यान सार्वजनिक ठिकाणी हात जोडून त्याची माफी मागितली होती. यावर तो म्हणाला, “मला या गोष्टी खूपच विचित्र आणि अनकंफर्टएबल वाटतात.” विवेक ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर विवेकने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान स्टेजवर परफॉर्मन्स देताना सलमान खानची हात जोडून माफी मागितली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा