Monday, June 24, 2024

आपल्या अभिनयाने तरुणींना घायाळ करणारा शाहिद किती वेळा पडलाय प्रेमात? स्वत:च केला खुलासा

बॉलिवूडमधील क्युट आणि चार्मिंग अभिनेता म्हणून शाहिद कपूर ओळखला जातो. बॉलिवूडमधील बेस्ट कपल म्हणूनही शाहिद आणि मीराची जोडी ओळखली जाते. शाहिदने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या प्रभावी भूमिका साकारत स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केले आहे. तो नेहमीच त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील मीडियामध्ये चर्चेत असतो. शाहिद सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील तुफान चर्चेत असतो. तो सतत त्याचे पत्नीसोबतचे, कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. आज जरी शाहिद त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये स्थायिक झाला असून तो त्यात खुश आणि समाधानी देखील आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा शाहिद त्याच्या अफेयरमुळे, त्याच्या रिलेशनशिपमुळे मीडियामध्ये सतत गाजताना दिसायचा. शाहिदचे अनेक अभिनेत्रींसोबत सिरिअस अफेयर होते, तर काही अभिनेत्रींसोबत त्याचे फक्त नाव जोडले गेले. मात्र एका मुलाखतीदरम्यान शाहिदने स्वतः तो कितीवेळा प्रेमात पडला आहे याचा खुलासा केला होता. 25 फेब्रुवारी 1981 रोजी शाहिद कपुर याचा जन्म झाला. या निमित्ताने त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणुन घेऊ या…

काही वर्षांपूर्वी एका शोमध्ये शोची सूत्रसंचालक असलेल्या अभिनेत्री सिमी गरेवालने शाहिदला तो किती वेळा प्रेमात पडला होता याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना शाहिद जरासा गोंधळला आणि म्हणाला होता की, हा त्याच्यासाठी खूप कठीण प्रश्न होता आणि तो या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. कोणत्याही मुलासाठी हा खूपच अवघड प्रश्न असल्याचे देखील तो म्हणाला. पुढे त्याने सांगितले की, “जेव्हा पण मी कोणत्याही मुलीला भेटतो तेव्हा मी लगेच तिच्या प्रेमात पडतो. मग मी 3 वर्षाचा असलो तरी असेच घडते. हे माझे खरे प्रेम आहे.”

शाहिद कपूर 2011 साली ‘इंडियाज मोस्ट डिजायरेबल शोमध्ये पोचला होता. त्यावेळेस त्याने सिमी गरेवाल यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारताना याबद्दल सांगितले होते. सिमीने त्याला त्याच्या प्रेमाबद्दल विचारले तेव्हा त्याने यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या शोमध्येच त्याने तो दोन वेळा प्रेमात पडल्याचेही कबूल केले होते. सिमी यांनी त्याला त्याच्या गंभीर प्रेमाबद्दल विचारल्यावर शाहिद म्हणाला होता की, “असे अजूनपर्यंत नाही झाले. मला नाही वाटत की मी खूप मोठा झालो आहे. गंभीर रूपात वाढलेले प्रेम काय आहे?” यावर सिमी म्हणाल्या, “गंभीर प्रेम दोन परिपक्व व्यक्ती प्रेमात पडल्यानंतर होते.” त्यावर शाहिद म्हणाला, “नाही माझ्यासोबत असे काही नाही झाले. आमच्यापैकी एक नेहमीच अपरिपक्व होते.”

शाहिदने 2015 साली मीरा राजपूतसोबत लग्न केले होते. मीरा आणि शाहिदमध्ये तब्ब्ल 13 वर्षांचे अंतर आहे. मात्र शाहिदच्या मते मीरा त्याच्यापेक्षा अधिक परिपक्व आहे. (when shahid said everytime i met a girl i fell in love)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘हम दिले दे चुके सनम’पासून ते ‘पद्मावत’पर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भन्साळींचे सिनेमे; तरीही बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

हे देखील वाचा