×

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने शाहिद कपूरला प्रेमात दिला होता धोका, अभिनेत्याने स्वतः केला त्या दिवसांचा खुलासा

शाहिद कपूर त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी तसेच अभिनेत्री करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबतच्या अफेअरसाठी ओळखला जातो. शाहिदचे प्रियंकासोबत इतके गंभीर संबंध होते की, एकदा पहाटे प्राप्तिकर विभागाने प्रियांकाच्या घरावर छापा टाकला तेव्हा शाहीदनेच दरवाजा उघडला. या घटनेने एकेकाळी बरीच चर्चा रंगली होती.

मात्र, केवळ अफेअरच नाही तर शाहिदचे प्रियांकासोबतचे ब्रेकअपही खूप चर्चेत होते. आपण चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगून प्रियांकाने शाहिदला टाळण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. शाहिदला प्रियांकावर संशय आला आणि त्याने त्याच्या एका मित्राला अभिनेत्रीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. शाहीदचा हा मित्र प्रियांका आणि शाहिदचा कॉमन फ्रेंड होता, असं म्हटलं जातं.

शाहिदच्या या मित्राने प्रियांकाबद्दल केलेला खुलासा ऐकून अभिनेत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे प्रियंका शाहिदपासून दूर होत नव्हती, तर तिचे कारण काहीतरी वेगळे होते. प्रियांकाचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर होते आणि तिने शाहिदची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर शाहिद आणि प्रियांकामध्ये ब्रेकअप झाले.

एकदा चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये शाहिदने त्याच्या ब्रेकअपबद्दल मोकळेपणाने सांगितले. शाहिदने सांगितले होते की, करीना कपूरसोबतचे त्याचे अफेअर प्रियांका चोप्रापेक्षा जास्त काळ टिकले. एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने त्याची फसवणूक केल्याचेही शाहिदने करणच्या शोमध्ये म्हटले होते. असे मानले जाते की शाहिद प्रियांका चोप्राचा उल्लेख करत होता.

हेही वाचा-

Latest Post