Saturday, June 15, 2024

कोटींची ऑफर दिली तरी लग्नात न गाणाऱ्या केकेने नेहमीच स्वतःच्या तत्वांवर जगले आयुष्य

गायक केकेचे वयाच्या ५३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. केकेच्या अशा अचानक निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडसह त्याच्या जगभरातील फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये कॉन्सर्टसाठी गेलेल्या केकेचे लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. केकेने त्याच्या करिअरमध्ये अतिशय सुंदर अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी गायली. कृष्ण कुमार कुन्नुथ उर्फ केकेने आपल्या आवाजाने सर्वच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. प्रत्येक भावनेचे गाणे त्याने अतिशय सहज गायले. बॉलिवूडच्या टॉप गायकांमध्ये नेहमीच त्याची गणना झाली. ‘यारों’, ‘तू आशिकी है’, ‘लबों को’, ‘तडप तडप के’, ‘खुदा जाने’ आदी अनेक हिट गाणी त्याने त्याच्या करिअरमध्ये गायली. आपल्या गाण्यांसोबतच केके त्याच्या काही तत्त्वांमुळे देखील खूप प्रसिद्ध होता.

केके त्याचे जीवन त्याच्या नियमांवर आणि त्याच्या तत्वांवर जगायचा. एका मुलाखतीमध्ये केकेला विचारले गेले की, त्याने कधी कोणती ऑफर नाकारली आहे का? यावर तो क्षणाची विलंब न लावता म्हणाला होता की, “हो मी लग्नांमध्ये गाण्यासाठी नेहमीच नकार देतो.लग्नांमध्ये गाण्यासाठी भलेही मला कोणी १ कोटी रुपयांची जरी ऑफर दिली तरी मी यासाठी नेहमीच नकार देतो.” पुढे त्याला चित्रपटांमध्ये अभिनय करण्यावरूनन प्रश्न विचारला गेला, त्यावर तो म्हणाला की, “ओह प्लीज! राहूच द्या, मी शेंगदाण्याची अभिनय नाही करू इच्छित. मला काही वर्षांपूर्वी एका सिनेमाची ऑफर मिळाली होती. मात्र मी यासाठी स्पष्ट नकार दिला होता.”

कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अत्यवस्थ वाटू लागल्यानंतर केकेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. ३१ मे रोजी रात्री १०.४५ मिनिटांनी त्याचे निधन झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूनंतर सर्वांनाचा धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा